“चार फुल आणि एक ज्ञानपीठ: विनोद कुमार शुक्ल”

News

“हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था।
हताशा को जानता था, इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया।
मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ।
मुझे वह नहीं जानता था मेरे हाथ बढ़ाने को जानता था।
हम दोनों साथ चले… दोनो एक दूसरे को नहीं जानते थे,
साथ चलने को जानते थे।”

  • विनोद कुमार शुक्ल

हिंदी साहित्यातील प्रख्यात कवी आणि लेखक… यांना २०२४ सालासाठीचा ५९वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सन्मान त्यांच्या सृजनशीलतेची आणि साहित्यिक योगदानाची पावती आहे.

साहित्यिक प्रवास
शुक्ल यांची साहित्यिक कारकीर्द त्यांच्या पहिल्या कविता संग्रह ‘लगभग जय हिंद’ (1971) पासून सुरू झाली. त्यानंतर ‘वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह’ (1981), ‘सब कुछ होना बचा रहेगा’ (1992) आणि ‘अतिरिक्त नहीं’ (2000) असे अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या ‘नौकर की कमीज’ (1979) या कादंबरीवर मणि कौल यांनी चित्रपट बनवला, ज्याने त्यांच्या लेखनाला व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली.

काव्यशैली आणि रचना
शुक्ल यांच्या कवितांमध्ये प्रेम, प्रकृती आणि सामान्य माणसाच्या जीवनातील सूक्ष्म पैलूंचे सुंदर वर्णन आढळते. त्यांच्या रचनांमध्ये जादुई वास्तववादाची झलक दिसते, जी त्यांच्या साहित्याला वेगळेपण देते. उदाहरणार्थ, त्यांच्या ‘सबसे गरीब आदमी की’ या कवितेत ते लिहितात:
“सबसे गरीब आदमी की
सबसे कठिन बीमारी के लिए
सबसे बड़ा विशेषज्ञ डॉक्टर आए
जिसकी सबसे ज्यादा फीस हो”
या ओळींमध्ये ते समाजातील विषमता आणि गरिबांच्या समस्यांवर प्रकाश टाकतात.

‘चार फूल हैं और दुनिया है’ – शुक्ल यांच्या प्रवासाची झलक
अभिनेता आणि लेखक मानव कौल यांनी दिग्दर्शक अचल मिश्रा यांच्यासह ‘चार फूल हैं और दुनिया है’ या डॉक्युमेंटरीत शुक्ल यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ही डॉक्युमेंटरी मणि कौल आणि शुक्ल यांच्यातील संवादांवर आधारित आहे आणि त्यांचे साहित्यिक दृष्टिकोण उलगडते. ही फिल्म MUBI या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

साहित्यिक योगदान आणि पुरस्कार
शुक्ल यांच्या ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबरीसाठी त्यांना 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘आदमी की औरत’ या कथेनुसार बनलेल्या चित्रपटाला 66व्या वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये विशेष सन्मान मिळाला होता.
ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान होणे, हे हिंदी साहित्याच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. त्यांच्या साहित्यिक प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या रचनांनी वाचकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
जाता जाता एवढंच म्हणू…

जाते-जाते कुछ भी नहीं बचेगा जब
तब सब कुछ पीछे बचा रहेगा

और कुछ भी नहीं में
सब कुछ होना बचा रहेगा।

Leave a Reply