डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन : भारतीय अंतराळ विज्ञानाचे ज्ञानतेज हरपले!

आज भारताने एक द्रष्टा शास्त्रज्ञ, दूरदृष्टी असलेला शिक्षणतज्ज्ञ आणि अंतराळ विज्ञानाचे अध्वर्यू गमावले आहेत. डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांच्या निधनाने भारताच्या विज्ञान-शैक्षणिक क्षेत्राला कधीही भरुन न निघणाऱ्या पोकळीचा सामना करावा लागत आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताचा अंतराळ कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला, त्या महान व्यक्तिमत्त्वाला ही आदरांजली! प्रारंभिक जीवन आणि शिक्षण – विज्ञानाकडे झुकणाऱ्या बुद्धिमत्तेची सुरुवात२० ऑक्टोबर १९४० […]

Continue Reading

पाकिस्तानचा धक्कादायक खुलासा: तीन दशकांपासून दहशतवादाला पाठिंबा दिल्याची संरक्षण मंत्र्यांची कबुली

अलीकडेच जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य जगभर चर्चेचा विषय बनलं आहे. एका आंतरराष्ट्रीय मुलाखतीत त्यांनी थेट कबूल केलं की, “पाकिस्तान गेली तीस वर्षे दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत आणि विविध प्रकारचा पाठिंबा देत आलं आहे.” पाकिस्तानने दहशतवाद पसरवण्याची कबुली दिलीब्रिटनच्या स्काय न्यूज वाहिनीवरील यल्दा हकीम यांच्या मुलाखतीत […]

Continue Reading

जैन धर्मातील संथारा: आत्मशुद्धीचा अंतिम सोहळा

भारतीय संस्कृतीत जन्म आणि मृत्यू यांना एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. बहुतांश धर्मांमध्ये मृत्यू ही एक अपरिहार्य घटना मानली जाते, परंतु जैन धर्मामध्ये मृत्यूसुद्धा एक आध्यात्मिक निर्णय ठरू शकतो. ‘संथारा’ किंवा ‘सल्लेखना’ ही अशाच एका अद्वितीय धार्मिक परंपरेचे उदाहरण आहे. यात व्यक्ती स्वतःच्या इच्छेने अन्न-पाण्याचा त्याग करून मृत्यूला सामोरे जाण्याचा संकल्प करतो. या प्रक्रियेला ‘मरणव्रत’ […]

Continue Reading

शक्ती दुबे ते अर्चित डोंगरे: UPSC 2024 मध्ये यशाचा नवा आदर्श!

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल 2024 जाहीर झाला आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या आशा-अपेक्षांना उत्तर मिळालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो जणांनी या परीक्षेत यश मिळवलं, मात्र एक नाव विशेष ठसतं – शक्ती दुबे. देशातील पहिल्या क्रमांकाची यशस्वी उमेदवार बनण्याचा मान त्यांनी पटकावला आणि साऱ्या भारतात प्रेरणेची नवी ज्योत पेटवली. शक्ती दुबे – प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मनाच्या ताकदीचं उदाहरणप्रयागराजच्या […]

Continue Reading

मिशी कापल्यामुळे 11 लाखांचा दंड….

राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील एका लहानशा गावात घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाच्या वेदनेची कहाणी नाही, तर ही आहे भारतीय समाजात आजही खोलवर रुजलेल्या रूढी, परंपरांचे वास्तव दाखवणारी वस्तुपाठासारखी गोष्ट. एका साध्या निर्णयाचा एवढा मोठा परिणाम होऊ शकतो, हे या कुटुंबाने आपल्या अंगावर घेतलं. हा प्रसंग आहे एका गरीब पण सुसंस्कृत कुटुंबाचा, ज्यांनी आपल्या लहानग्या मुलाच्या […]

Continue Reading

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने स्थगित केलेला ‘सिंधू जल करार’ काय आहे ?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत, ज्यामध्ये 1960 साली झालेल्या सिंधू जल कराराचे तात्काळ स्थगन हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सिंधू जल करार : एक ऐतिहासिक पार्श्वभूमीसिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 सप्टेंबर 1960 […]

Continue Reading

निष्पाप भारतीय पर्यटकांवरील हल्ल्यानंतर हे आहेत कॅबिनेटचे मोठे निर्णय!

अलीकडेच दहशतवाद्यांनी काश्मीर मधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकारने तातडीने गंभीर निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या कॅबिनेटच्या उच्चस्तरीय बैठकीत खालील निर्णायक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत : १) 1960 चा सिंधू जलवाटप करार स्थगितभारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये झालेला सिंधू […]

Continue Reading

आधी धर्म विचारला मग गोळ्या झाडल्या

जगात स्वर्ग मानल्या जाणारं काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन हे ठिकाण, डोंगरांनी वेढलेलं, हिरवाईने नटलेलं. येथे पर्यटक फोटो काढण्यात, घोडेस्वारी करत डोंगर पाहण्यात, निसर्गाच्या कुशीत रमलेले होते. पण दुपारी साधारण २:३० वाजता, आनंदाच्या त्या वातावरणावर काळरात्र उतरली… चार दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वर्दीत बैसरनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या हातात रायफल्स होत्या, डोळ्यांत निर्दयता.काही क्षणांतच हवेत गोळ्यांचे आवाज घुमू लागले. लोकांनी […]

Continue Reading

महाराष्ट्रातील पहिले ‘कार्बन न्युट्रल’ गाव!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्वतीय परिसरात वसलेले निवजे हे गाव आज महाराष्ट्रातील सर्वात प्रगत हरित गाव म्हणून ओळखले जात आहे. सुमारे ४८% वनविस्तार असलेले हे गाव आज जैवइंधन, सेंद्रिय शेती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे प्रतीक बनले आहे. गावच्या सरपंच वैष्णवी पालव यांच्या शब्दात सांगायचं झालं, तर “आता आम्ही ना जंगलातून लाकूड आणतो, ना एलपीजी सिलिंडर वापरतो. आमचं […]

Continue Reading

चित्रपताका: मराठी चित्रपट महोत्सवाची भव्य सुरुवात!

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी चित्रपताका महोत्सवाचे शीर्षकगीत देखील प्रकाशित करण्यात आले.कार्यक्रमास चित्रपट सृष्टीतील दिग्गज जसे किरण शांताराम, जब्बार पटेल, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विकास खारगे, स्वाती म्हसे पाटील, मीनल जोगळेकर […]

Continue Reading