Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

उपनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा, खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

MP Naresh Mhaske and MP Sanjay Dina Patil submitted a memorandum to the Railway Minister highlighting the issues faced at railway stations in Thane, Mira-Bhayandar, Vashi, and the MMR region.
MP Naresh Mhaske and MP Sanjay Dina Patil submitted a memorandum to the Railway Minister highlighting the issues faced at railway stations in Thane, Mira-Bhayandar, Vashi, and the MMR region.

पनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा 

‘स्वयंचलित’ दरवाजा बंद होणारी प्रणाली सर्व गाड्यांमध्ये अनिवार्य करा

स्थानकांवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापन करा

खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे गाड्यांचे वेळेवर १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करावे, ‘स्वयंचलित’ दरवाजा बंद होणारी प्रणाली सर्व गाड्यांमध्ये अनिवार्य करावी आणि स्थानकांवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशा महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.

दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे अध्यक्ष असलेल्या रेल्वेच्या तांत्रिक सल्लागार समितीची बैठक संसद भवन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या कमिटीचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातून खासदार नरेश म्हस्के व खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.

रेल्वेच्या देशापातळीवरील विविध महत्वपूर्ण कामांची माहिती बैठकीत देऊन, चर्चा करुन निर्णय घेतले जातात व धोरण निश्चित केले जाते. रेल्वे राज्यमंत्री श्री. वी. सोमन्ना, रवनीत सिंह बिट्टू तसेच रेल्वेचे केंद्रीय स्तरावरील सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई उपनगरीय सेवेबद्दल महत्वपूर्ण सूचना केल्या.

सुरक्षितता, नोकर भरती, धोरण व उपाययोजनेबाबत यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत विस्तृतपणे माहिती दिली. देशभरातून प्रत्येक राज्यातून ज्यांना या कमिटीमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे त्यांनी सुध्दा या बैठकीत चर्चा केली. आज देशपातळीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा जो विकास होत आहे त्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले.

आज स्टेशनवर होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून पडून हजारो प्रवाशांचा मृत्यू होत आहे. १२ डब्यांच्या ट्रेनमधून क्षमतेपेक्षा ४ पट अधिक प्रवासी मजबुरीने प्रवास करत आहेत. यामुळे ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होणे, जखमी होणे आणि कायमचा प्रवासी जायबंदी होण्याच्या घटना नित्याच्या झाल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणली. याकरता १५ डब्यांच्या लोकल गाड्या तातडीने मोठ्या संख्येने सुरु कराव्यात, स्वयंचलीत दरवाजे तातडीने बसवावेत, फलाटांची उंची व रुंदी वाढविण्याचे काम जे संथ गतीने सुरु आहे ते जलद गतीने सुरु करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच रेल्वे स्थानकांतील गर्दीवरील नियंत्रणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याची महत्वपूर्ण सूचनाही नरेश म्हस्के यांनी केली.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढे मांडल्या. सिडको प्राधिकरण आणि रेल्वे यांच्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे बेलापूर मधील रेल्वे स्थानकांचा विकास थांबला आहे. रेल्वे मंत्र्यांनी यात स्वत: लक्ष घालण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी करत दोन्ही प्राधिकारांमधील विसंवाद दुर करण्याची सूचना  केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता बेलापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

यावेळी ठाणे, मिरा भाईंदर, वाशी आणि एमएमआर रिजन मधील रेल्वे स्थानकांच्या समस्यांचे निवेदन खासदार नरेश म्हस्के आणि खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांना दिले.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest