थ्री इडिएट चित्रपट आठवतोय का? त्यातला फरहान कुरेशी, त्याचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचे स्वप्न असते. परंतु आई वडिलांच्या आग्रहाखातर तो इंजिनिअरिंग शिकत असतो. परंतु एक दिवस तो वडिलांविरोधात बंड करतो, आणि त्यांची परवानगी मिळवतो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या क्षेत्रात खूप नाव कमावतो. या चित्रपाट अमिर खानचा प्रसिद्ध डायलॉग आहे,
“Success के पीछे मत भागो, Excellence का पीछा करो, Success झक मारके तुम्हारे पीछे आयेगी।“
हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं कारण म्हणजे आज आपण अशाच एका अवलियाला भेटणार आहोत. ज्याने १३ वर्षे इजिंनिअरिंगमध्ये यशस्वी करिअर करुन सुद्धा स्वतःची आवड जपण्यासाठी वाईल्डलाईफ फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला आणि आज तो अनेकांचे प्रेरणास्थान बनला आहे.
साई किरण भागवतुला… फोटोग्राफीतला अवलिया
हैदराबादचे साई किरण भागवतुला हाच तो अवलिया ज्याच्याबद्दल आ आपण जाणून घेणार आहोत, आणि थ्री इडिएट मधल्या फरहान प्रमाणे याला देखील आयुष्यात काही कठीण निर्णयांना सामोरे जावे लागले. १३ वर्षे आयटी क्षेत्रात यशस्वी करिअर असूनही, त्यांनी आपल्या निसर्गप्रेमासाठी आणि फोटोग्राफीच्या आवडीसाठी ‘Wildlife Whisperers’ या उपक्रमाची स्थापना केली. त्यांनी भारतभर आणि केनियामध्ये प्रवास करून निसर्गाचे निरीक्षण केले आणि त्यातून प्रेरणा घेतली. चला तर मग आयटी इंजिनिअर ते वाईल्डलाईफ फोटोग्राफर हा प्रवास करणाऱ्या साई किरण भागवतुला यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
आयटी क्षेत्रातून निसर्गाच्या कुशीत
साई किरण यांनी १३ वर्षे आयटी क्षेत्रात यशस्वी करिअर घडवले. पण त्यांच्या मनात निसर्गप्रेम आणि फोटोग्राफीची आवड सतत जागृत होती. २०२३ मध्ये त्यांनी आयटी नोकरी सोडून ‘Wildlife Whisperers’ या उपक्रमाची स्थापना केली. या निर्णयामागे त्यांनी भारतभर आणि केनियामध्ये प्रवास करून निसर्गाचे निरीक्षण केले आणि त्यातून प्रेरणा घेतली. आज आज त्यांचा हा प्रवास इतरांसाठी आदर्श बनत आहे.
‘Wildlife Whisperers’ — निसर्गातून शिकण्याचे व्यासपीठ
‘Wildlife Whisperers’ हे पारंपरिक स्टार्टअप नसून, निसर्गाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यरत आहे. या उपक्रमात विविध वर्कशॉप्स, निसर्ग सहली आणि इकोथेरपी प्रोग्राम्स आयोजित केले जातात. हे कार्यक्रम विशेषतः कॉर्पोरेट व्यावसायिक, शाळा आणि संघटनांसाठी तयार केले जातात.
निसर्गातील नेतृत्वाचे धडे
या वर्कशॉप्समध्ये सहभागी होणाऱ्यांना निसर्गातील प्राणी आणि त्यांच्या वर्तनातून नेतृत्व, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याचे धडे दिले जातात. उदाहरणार्थ, हत्तींच्या कळपातील सहकार्य, वाघांचे नेतृत्व कौशल्य आणि पक्ष्यांचे संवाद कौशल्य यांचा अभ्यास करून मानवी जीवनात त्याचा उपयोग कसा करता येईल हे शिकवले जाते.
मानसिक आरोग्यासाठी निसर्ग
साई किरण यांच्या मते, निसर्ग ही आपली खरी शाळा आहे. निसर्गात वेळ घालवणे हे मानसिक शांतता, सर्जनशीलता आणि आत्मपरिचयासाठी उपयुक्त आहे. त्यामुळेच ‘Wildlife Whisperers’ चे कार्यक्रम मानसिक आरोग्यासाठी प्रभावी ठरतात.
भारतातील विविध निसर्गस्थळांवरील वर्कशॉप्स
‘Wildlife Whisperers’ भारतातील विविध निसर्गस्थळांवर वर्कशॉप्स आयोजित करतात. त्यामध्ये मध्य प्रदेशातील कान्हा आणि पेंच नॅशनल पार्क, महाराष्ट्रातील ताडोबा, कर्नाटकमधील कबिनी, राजस्थानमधील रणथंबोर आणि केरळमधील वायनाड यांचा समावेश आहे. wildlifewhisperers.com ही साई किरण भागवतुला याची वेबसाईट आहे. तुम्ही जंगल सरफीचे चाहते असाल तर जरुर त्याची वेबसाईट जाऊन पहा.
फोटोग्राफी आणि निसर्गसंवर्धन
साई किरण यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून निसर्गाचे सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यांच्या ‘A Stare Through the Woods’ या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग निसर्गसंवर्धनासाठी वापरला जातो. ही एक अत्यंत प्रेरणादायी बाब असून अनेक तरुण साई किरण यांच्या या प्रकल्पाशी जोडले जात आहे. त्यांच्या विविध प्रकल्पांबाबत सोशल मिडियावर चर्चा देखील होताना दिसून येते.
आपली खरी ओळख कशी ओळखावी…?
• आपल्या आवडीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे.
• सुरक्षिततेच्या चौकटीतून बाहेर पडल्यावरच खरी वाढ सुरू होते.
• प्रकृतीशी जोडलेलं जीवन अधिक समाधानी असतं.
• छंदावर आधारित करिअर हे जास्त काळ समाधान देणारं ठरतंय.
साई किरण भागवतुला यांची ‘Wildlife Whisperers’ ही केवळ एक स्टार्टअपची कहाणी नाही; ती आहे एका माणसाच्या आतल्या आवाजाला ऐकण्याची, धाडसाने नवा मार्ग निवडण्याची आणि निसर्गाशी नातं जोडून स्वतःचं आयुष्य घडवण्याची प्रेरणादायी गाथा. आजच्या धावपळीच्या जगात, आपल्या छंदांना वेळ देणं, त्यांना व्यवसायात रूपांतरित करणं हे कठीण वाटू शकतं. पण साई किरण यांची कहाणी आपल्याला शिकवते की, योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि निसर्गप्रेमाच्या बळावर आपणही आपल्या स्वप्नांना वास्तवात आणू शकतो. ‘Wildlife Whisperers’ सारख्या उपक्रमातून निसर्गाच्या कुशीतून शिकण्याची, स्वतःला शोधण्याची आणि इतरांनाही प्रेरणा देण्याची संधी मिळते. या प्रवासात, निसर्ग आपल्याला सहकार्य, संयम, आणि सहजीवनाचे धडे देतो, जे केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर व्यावसायिक क्षेत्रातही उपयोगी पडतात.
तुमचं स्वप्न काय आहे?
आजही अनेकजण असे आहेत जे पोटापाण्यासाठी वेगळी वाट निवडतात, पण मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं असतं. तर विचार करा — तुमच्यातही एखादा थ्री इडिएट्समधला ‘फरहान’ लपला आहे का? तुमचं एखादं असं स्वप्न जे अजूनही पूर्ण व्हायचं आहे? Comment मध्ये नक्की सांगा — तुमचा आवडता छंद कोणता आहे? तुम्हालाही तुमच्या छंदावर आधारित व्यवसाय सुरू करायचाय का?