इंडियन आयडलच्या मंचावर संधी हुकली; पण आज त्याच गायकाचं गाणं इंस्टाग्रामपासून म्युझिक चार्ट्सपर्यंत धुमाकूळ घालतंय. नाव आहे रितो रीबा (Rito Riba) आणि गाणं आहे – दिलरुबा दिलनशीं!
पासीघाटपासून सुरू झाला संगीताचा प्रवास
अरुणाचल प्रदेशातील पासीघाटचा रितो लहानपणापासून संगीताच्या वातावरणात वाढला. आईकडून ऐकलेली लोकगीतं आणि संगीताची आवड यातून त्याचा प्रवास सुरू झाला. २०१४-१५ च्या सुमारास त्याने यूट्यूबवर गाणी अपलोड करायला सुरुवात केली.
इंडियन आयडलमध्ये संधी हुकली, पण हार नाही मानली
२०२२ मध्ये त्याने इंडियन आयडलच्या १३ व्या पर्वात स्वतःचं हीर रांझा हे गाणं सादर केलं. मात्र, त्याला टॉप १५ मध्ये स्थान मिळालं नाही. पण त्याने हार मानली नाही. पुढे हेच गाणं स्वतंत्रपणे रिलीज केलं आणि त्याला लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळाले. त्यानंतर मेरी बनोगी क्या, इक तू ही है यांसारखी गाणीही लोकप्रिय झाली. श्रेया घोषालसोबत गायलेलं प्यार आता है हे गाणंही विशेष चर्चेत आलं.
‘दिलरुबा दिलनशीं’ची सोशल मीडियावर धूम
आता त्याचं दिलरुबा दिलनशीं हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज झालेल्या दिलफेक या ईपीमधील हे एक गाणं आहे. ऐंशीच्या दशकातील रोमँटिक संगीताची झलक, सुंदर शब्द आणि रितोचा आवाज यामुळे गाण्याला वेगळीच ओळख मिळाली. नोव्हेंबरमध्ये ते शाझॅमच्या भारतीय चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावरही पोहोचलं.
“फक्त रील्ससाठी गाणी नकोत”
विशेष म्हणजे, रितोने एका मुलाखतीत सांगितलं की, आता त्याला केवळ रील्सवर व्हायरल होणारी गाणी बनवायची नाहीत; तर स्वतःला आवडणारं संगीत करायचं आहे.
इंडियन आयडलमध्ये टॉप १५ नाही… पण आज स्वतःच्या संगीताच्या जोरावर लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच आहे!
