Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

Pitru Paksha Date Importance कर्णाचं श्राद्ध ते रामाने केलेलं पिंडदान; भाद्रपद महिन्यातच येणाऱ्या पितृपक्षाची रोचक कथा

कर्णाचं श्राद्ध ते रामाने केलेलं पिंडदान; भाद्रपद महिन्यातच येणाऱ्या पितृपक्षाची रोचक कथा.

भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. सण-उत्सवांसोबत पितृपक्षालाही महत्त्व आहे. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमवास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, आपल्या संस्कृतीत पितृपक्ष का असतो आणि तो भाद्रपदातच का येतो? भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष असण्यामागील कारण आणि पितृपक्षाच्या प्राचीन परंपरा आणि मान्यता यांविषयी जाणून घेऊया…

भारतीय संस्कृतीत येणारे सण-उत्सव यांना वैज्ञानिक-शास्त्रीय कारणं असतात. त्यांच्या मागे एक विचार असतो. संपूर्ण भारतात चातुर्मासाला अधिक महत्त्व आहे. कारण या कालावधीत मुख्य सण-उत्सव, व्रत-वैकल्ये असतात. चातुर्मास हा सात्विकतेचा काळ मानला जातो. श्रावणानंतर भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवानंतर येणारा महत्त्वाचा पक्ष म्हणजे पितृपक्ष. संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या सण-उत्सवांपेक्षा पितृपक्षाचा कालावधी सर्वाधिक असल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. मात्र, भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष असण्यामागील कारण आणि पितृपक्षाच्या प्राचीन परंपरा आणि मान्यता यांविषयी जाणून घेऊया…

पितृपक्षात घरातील व्यक्ती मृत झाल्यावर, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध मातृ व पितृ वंशपरंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. वडील, आजोबा, पणजोबा अशा तीन पिढ्यांच्या नावांचा उल्लेख करून, हे स्मरण केले जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. श्रद्धापूर्वक हे विधी करताना, प्रयत्नपूर्वक कार्य करण्याची एक समन्वयी भूमिका आपल्या धर्मशास्त्राने घालून दिली आहे. केवळ हिंदू धर्मशास्त्रातच असा अन्न, पाणी देण्याचा विचार मांडला गेला आहे, पारशी, ख्रिस्ती, मुस्लीम, जैन अशाही धर्मांमध्ये पितरांना अन्न, पाणी देण्याची प्रथा आहे. श्राद्ध विधी करताना श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे श्राद्ध तर्पण विधी करताना ते श्रद्धापूर्वक करावे, असे सांगितले जाते.

पितृपक्ष भाद्रपद महिन्यातच का येतो ?

पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातच का येतो, याविषयी धर्मशास्त्रात खगोलशास्त्राचा आधार भूमिका मांडल्याचे दिसते. दक्षिणायन, उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेची कालमापन गणना आहे. पृथ्वीवरील एक दिवस हा २४ तासांचा मानला गेला आहे. पण जे मृत झाले, त्यांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस, असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र आहे. तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते. कर्क संक्रांत ते धनु संक्रांतीचा कालावधी हा पितरांचा होय. मध्यान्हात पितरांना भोजन (अन्नपाणी) देण्यासाठीचा काळ म्हणजे पितृपंधरवडा म्हणजेच भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा कालावधी होय, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

वेदांच्या पितृयज्ञाला पुराणांमध्ये विस्तार मिळाला आणि त्याला श्राद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा फार प्राचीन काळापासून सुरू आला आहे. महाभारताच्या शिस्त पर्वात पितृपक्षासंदर्भातील आख्यायिका असल्याचे सांगितले जाते. या पर्वात श्राद्ध करण्याची परंपरा सांगितण्यात आली आहे. भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला श्राद्ध पक्षाबद्दल सांगितले. महाभारतानुसार सर्वप्रथम श्राद्धाचे उपदेश महर्षी नीमीने अत्रीमुनीना दिले होते. श्राद्धाचे उपदेश दिल्यानंतरच श्राद्ध कर्माची प्रथा सुरू झाली आणि हळूहळू समाजातील प्रत्येक वर्णात प्रचलित झाली, अशी मान्यता आहे.

महाभारतातही पिंडदानाचे आहेत उल्लेख

महाभारताच्या भीषण युद्धासंहारानंतर युधिष्ठिराने कौरव आणि पांडव अशा दोन्ही बाजूने कामी आलेल्या सर्व वीरांचे अंत्यसंस्कार केले होते, असे सांगितले जाते. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून कर्णाचेही श्राद्ध युधिष्ठिराने केले. कर्ण तर आपल्या कुळाचे नाही, तर त्यांचे श्राद्ध मी कसे करू?, असा प्रश्न युधिष्ठिराला पडला. कर्ण पांडवांचे थोरले बंधू होते. त्यामुळे कर्णाचेही श्राद्ध करायला हवे, असे उत्तर श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला देऊन कर्णाची जन्मकथा सांगितली, असे म्हटले जाते.

प्रभू रामचंद्रांनी केले वडिलांचे पिंड दान

प्रभू रामचंद्र हे आपले पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले होते. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे दिसू लागले. श्रीरामांनी पुन्हा पिंडदान केले. मात्र, पुन्हा तेथे किडे दिसून लागले. असे अनेकदा घडल्यावर शेवटी श्रीरामचंद्रांनी महादेव शिवशंकराची आराधना केली. महादेव तेथे प्रकट झाले आणि श्रीरामांना सांगितले की, मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे. श्रीरामांनी तत्कालीन मंथरावन येथे जाऊन पिंडदान केले. आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. आजच्या काळातही ती शिवलिंगे पाहायला मिळतात. हा भाग थेथे मुक्तिश्वर म्हणून ओळखला जातो. अनेक जण पितरांना मुक्ती मिळावी, म्हणून तिलतर्पणपुरी येथे जाऊन श्राद्ध करतात.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest