म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि वसई येथील 5285 घरांची, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांची विक्री जाहीर करण्यात आली. या घरांसाठी 14 जुलै 2025 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
या लॉटरीमध्ये एकूण 565 घरे सर्वसमावेशक योजनेअंतर्गत, 3002 घरे एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत, 1677 घरे म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्या सदनिकांअंतर्गत, तर 50 टक्के योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
लॉटरीतील सर्वात स्वस्त घर कल्याण तिसगाव येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून, त्याची किंमत 9 लाख 55 हजार रुपये आहे. तर सर्वात महागडे घर ठाण्यातील बाळकूम परिसरात असून, मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या या घराची किंमत 84 लाख 85 हजार रुपये इतकी आहे.
अर्ज करण्याची माहिती
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 13 ऑगस्ट, रात्री 11.59 वाजेपर्यंत
अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख :- 14 ऑगस्ट, रात्री 11.59 वाजेपर्यंत
स्वीकृत अर्जाची यादी :- 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता, म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in
सोडत दिनांक व वेळ :- 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता, ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होईल.