59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास; भारतीय पासपोर्टची गगनभरारी

59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, जगभरातील देशांच्या पासपोर्टच्या जागतिक क्रमवारीत भारतीय पासपोर्टने महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारताने नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत 85 व्या स्थानावरून 77 व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भारतीय नागरिकांना आता 59 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा-ऑन- अरायव्हल प्रवेश मिळणार आहे.

भारतीय आफ्रिकेतील 19 देशांमध्ये, आशियातील 18 देशांमध्ये, उत्तर अमेरिकेतील 10 देशांमध्ये, ओशनिया प्रदेशातील 10 देशांमधये आणि दक्षिण अमेरिकेतील एका देशात व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. या यादीमध्ये मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव, थायलंड हे देश भारतीयांना व्हिसा मुक्त प्रवेश देतात. तर श्रीलंका, मकाऊ, म्यानमारसारख्या देशात व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश मिळू शकणार आहे. भारताला यामुळे नवे प्रवासाचे आणि व्यवसायाचे मार्ग खुले होणार आहेत. भारताची जागतिक प्रतिष्ठा यामुळे सुधारण्यास मदत होईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंगापूरने अव्वल स्थान पटकावले आहे. इथल्या पासपोर्ट धारकांना 193 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो. या जागतिक क्रमवारीत सिंगापूरचे स्थान सर्वोच्च आहे. फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, डेन्मार्क, आयर्लंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन इत्यादी युरोपीय देश तिसऱ्या- चौथ्या क्रमांकावर आहेत. या देशांना 192 ते 191 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय?
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हे जगभरातल्या 199 पासपोर्ट्सचे वार्षिक रँकिंग आहे. ह्या इंडेक्सची गणना आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) माहितीवर आधारीत असते. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हा एक अचूक आणि मान्यताप्राप्त मापदंड आहे जो पासपोर्ट धारकाचा जागतिक प्रवास दाखवतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *