New_GST_Rules

GST Rate Cut : पिझ्झा, पनीर आणि मॅगी झाली स्वस्त; पहा कोणत्या वस्तू झाल्या Zero GST

News

GST Rate Cut जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक बुधवारी दिल्लीत सुरु झाली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. GSTचे आता फक्त दोन स्लॅब असतील. ५ टक्के जीएसटी आणि १८ टक्के जीएसटी. १२ आणि २८ टक्के जीएसटीचा स्लॅब सरकारने बंद केला आहे. २२ सप्टेंबरपासून म्हणजेच घटस्थापनेपासून ही कर प्रणाली लागू केली जाणार आहे. काय स्वस्त होणार आणि काय महागणार हे जाणून घेऊ.

कुठल्या वस्तूंवर असणार शून्य टक्के जीएसटी?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फक्त दोन टॅक्स स्लॅब असतील, अशी घोषणा केली आहे. त्यात अनेक Daily Use वस्तू झीरो जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, असा प्रस्ताव आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे. तसंच पेन्सील, कटर, रबर आणि वह्या यांवरच्या १२ टक्के जीएसटी हटवण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तूही स्वस्त होणार आहेत. याशिवाय ३३ औषधांवरचा जीएसटीही शून्य करण्यात आला आहे त्यामुळे ही औषधंही स्वस्त होतील. यासह शॅम्पू, साबण, तेल या दैनंदिन वापरातील वस्तू ५ टक्के जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेल्या आहेत. बेकरीचे पदार्थ, स्वीट्स, पास्ता, कॉफी, नूडल्स यांच्यावरचा जीएसटीही ५ टक्के करण्यात आला आहे. थर्मामीटर आणि ग्लुकोमीटर यांच्यावरचा जीएसटीही १८ वरुन ५ टक्के करण्यात आला आहे त्यामुळे या वस्तूही स्वस्त होणार आहेत. चीज आणि लोणी यावरचा टॅक्स १२ वरुन ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे चीज आणि लोणीही स्वस्त होणार आहे.

२८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू आता १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये
कार, बाईक, थ्री व्हिलर, एसी, फ्रिज अशा सगळ्या वस्तूंवर असलेला २८ टक्के जीएसटी आता १८ टक्के करण्यात आला आहे. तसंच सिमेंटवरचा जीएसटीही १८ टक्के करण्यात आला आहे. ३५० सीसीच्या बाईक आणि त्यांचे ऑटो पार्ट्स हेदेखील १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी स्वस्त होतील.

त्यामुळे जीवनावश्यक वस्तू या स्वस्त होणार आहेत. तसेच ज्यांच्यावर २८ टक्के जीएसटी होता तो आता १८ टक्के करण्यात आला आहे. यामुळेदेखील कार, बाईक यासारख्या गोष्टी स्वस्त होणार आहे. त्यामुळे यावर्षीची घटस्थापना सर्वसामान्य लोकांसाठी आनंददायक ठरणार आहे.
नवीन जीएसटी प्रणाली विषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Leave a Reply