उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

News Political News

प्रिय कॉमन मॅन,
जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र…

खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ झाल्यासारखं वाटलं होतं पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर जो योजनांचा आणि कामांचा तडाखा लावला अन कुठल्याबी विघ्नात लोकांमधी उतरून काम करायला लागलात तवा वाटलं हा माणूस आधीच्या मुख्यमंत्र्यासारखा आमच्याबरं फटकून वागणारा नाय, तर आपुलकीनं जवळ घेणाराय. कुठं काय बेक्कार घडलं की लगीच मदतीला हजर, रस्त्यावर ऍक्सिडंट झालेल्या बघितला की लगीच ताफा थांबवून मदत, कोणी आमच्यासारखा अडचण घेऊन आला की लगीच फाडला चेक.. आव असा CM आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. CM असून तुमच्यातला तो कॉमन मॅन आम्ही पहिलाच पण तुमच्यातला खरा शिवसैनिक आम्ही सगळीकडंच बघत असतो.

सायेब तुमची लै मदत झालीय बघा आमाला.. मागल्या वर्षी भावाला पोरगी झाली अन घरात लक्ष्मी आली. आयच्यान सांगतो तिच्या भविष्याच्या खर्चाचं टेन्शनच आलं नाही बघा कारण तुमी आणलेली ‘लाडकी लेक योजना’. आवो तुमी वयोवृद्ध लोकांसाठी एसटी फुकट केल्यापासून आमच्या अण्णांचा तर पाय घरात ठरना, नुसतं लेकीकडं पळतंय.. आन आमची तायडी बी लै खुश हाय बघा सायेब तुमच्यावर कारण माह्यासारख्या सक्ख्या भावाला जमलं नाही ते तुम्ही ‘लाडकी बहीण योजना’ सुरु करून केलंत. पण मी उलसाक नाराजय तुमच्यावर अहो तुम्ही महिलांसाठी एसटीत हाफ तिकीट केल्यापासून मला कुठं जायलाच मिळना झालंय, लग्नकार्य, बाजारहाट कुठंबी आमची मंडळीच निघतेय..सायेब खरं सांगायचं तर पैसे वाचत्यात. आन एक शेवटचं बोलतो सायेब शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफ केल्याबद्दल धन्यवाद! आता हिरव्यागार वावराला वीचबीलाचं भ्या वाटत नाय आणि १ रुपयात पीकविमा देऊन तर लै मोठा आधार दिलात. खरंच थँक यु!

सायेब माह्यासारख्या असंख्य शेतकरी भावांचं, लाडक्या बहिणीचं प्रेम आन थोरामोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबतय. लहान भाऊ म्हणून प्रेमाचा एक सल्ला देतो तुमचा ६० वा वाढदिवस आलाय आन आमाला तुमचा १०० वा वाढदिवस साजरा करायचंय त्यामुळं आमची काळजी घेता घेता सोताची बी काळजी घ्या. तब्येतीकडं लक्ष द्या कारण आमच्यातला हा कॉमन मॅन आमाला नेहमी मनानं तरुण आन शरीरानं ठणठणीतच बघायचाय. शिंदे सायेब तुमी दीर्घायुषी व्हावं हीच आमची सदिच्छा आन या एका कॉमन मॅन कडून डेडिकेटेड टू कॉमन मॅनला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

-आपलाच शेतकरी भाऊ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *