Charlie Kirk Death News: खळबळजनक! अमेरिकेत ट्रम्प यांच्या राईट हँडची गोळ्या घालून हत्या

Charlie Kirk Death News Charlie Kirk Death News

Charlie Kirk Death News: अमेरिकेत बुधवारी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि कंझर्वेटिव्ह यूथ ग्रुप Turning Point USA चे सहसंस्थापक व सीईओ चार्ली कर्क (वय ३१) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

ही घटना युटा व्हॅली विद्यापीठात घडली. “American Comeback” दौऱ्याअंतर्गत आयोजित चर्चासत्रादरम्यान कर्क विद्यार्थी व उपस्थित जनतेसमोर भाषण करत असताना अचानक त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले व काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी गोंधळ, व्हिडीओ व्हायरल

https://twitter.com/sentdefender/status/1965849631352651828


गोळीबारानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात विद्यार्थी व उपस्थित लोक घाबरून पळताना दिसत आहेत. तर, कर्क मानेला हात लावून खाली पडताना दिसतात. पोलिसांच्या मते, विद्यापीठापासून २०० यार्ड अंतरावर असलेल्या एका इमारतीच्या गच्चीवरून गोळीबार झाल्याची शक्यता आहे. मात्र, मारेकरी अद्याप फरार असून तपास सुरू आहे.

ट्रम्प यांनी व्यक्त केला खेद

चार्ली कर्क यांच्या निधनानंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोल दुःख व्यक्त केले. ट्रम्प यांनी Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले – चार्ली हा उत्तम माणूस, देशभक्त आणि लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान होता. आपण सर्वांनी त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. याशिवाय, ट्रम्प यांनी अमेरिकेत रविवारपर्यंत राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

https://twitter.com/WhiteHouse/status/1965880535659470994

चार्ली कर्क कोण होते?

चार्ली कर्क हे अमेरिकन कंझर्वेटिव्ह युवा चळवळीतील महत्त्वाचे नाव होते. त्यांनी २०१२ मध्ये Turning Point USAची स्थापना केली. त्यांच्या भाषणांमुळे व वादग्रस्त मतांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. कोविड महामारीसंदर्भात चुकीची माहिती पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. हवामान बदल ही संकल्पनाच खोटी असल्याचा त्यांचा दावा होता. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी ट्रम्पना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळवून दिला.
त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत मोठी शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *