Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये माजी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना गुरूवारी निर्दोष मुक्त केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ एका मोटारसायकलवर ठेवलेल्या IED (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) ने स्फोट घडवण्यात आला […]

Continue Reading

उपराष्ट्रपती पद रिक्त… धनखडांच्या राजीनाम्यानंतर सभागृह अध्यक्ष कोण?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सोमवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकिय क्षेत्रात सगळ्यांनाचं धक्का बसला. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 17 जुलै रोजी एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आपल्याला प्रकृती अस्वास्थ जाणवत असून डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्या कारणास्तव […]

Continue Reading

चीनचा “वॉटर बॉम्ब”; ब्रम्हपुत्रेवरून भारत-चीन संघर्षाचा नवा अध्याय

चीन आणि भारतातील संबंध कायमच तणावपूर्ण राहिलेले आहेत. विशेषत: लडाख भागातील सीमावाद. आता एका नव्या कारणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनने ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधत असल्याची घोषणा केली आहे. या कामाची सुरूवात शनिवारी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. जवळपास 12 लाख कोटी रूपये खर्चून हे धरण […]

Continue Reading

ठाकरे VS दुबे: भाषेच्या वादात ‘X’ वर शाब्दिक रणकंदन

मराठी आणि हिंदी मुद्दयावरून राज्यात वादविवाद सुरू आहेत. अमराठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. निशिकांत दुबे यांनी “स्वत:च्या घरी कुणीही सिंह असतो. हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ… […]

Continue Reading

उद्धवजी, तुम्हाला सत्तेत आणतो’ – फडणवीसांची सभागृहात धक्कादायक ऑफर!

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत […]

Continue Reading

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका […]

Continue Reading

मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या […]

Continue Reading

६५ वर्षांचा तरुण विरुद्ध ८५ वर्षांचा पुढारी !

“अहो तुमचं वय ८० झालं, ८५ झालं तुम्ही कधी थांबणार आहात की नाही ?” हे शब्द होते ६५ वर्षांचे  अजित पवार यांचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या पहिल्या मेळाव्यात त्यांनी आपले काका, गुरु असे सर्व काही असलेल्या शरद पवारांचे वय काढत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. हे आठवायचे कारण म्हणजे आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासमोर एका […]

Continue Reading

विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू खासगी सचिव म्हणून कार्य केलेल्या या अनुभवी अधिकाऱ्याला, भारत-पाकिस्तान संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते एक अत्यंत अनुभवी, शांत, परिपक्व आणि राजनयिक मुत्सद्देगिरीने समृद्ध अधिकारी आहेत. शस्त्रसंधी […]

Continue Reading

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएलच्या पुढील सामन्यांचं काय? वाढता तणाव आणि IPL स्थगिती

2025 मधील इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग सध्या स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे बीसीसीआयने (BCCI) आठवडाभरासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे रोजी जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आणि धरमशाला येथे सुरू असलेला सामना थांबवावा लागला. IPL 2025 स्थगित होण्यामागील प्रमुख […]

Continue Reading