बाल्कनीत बुलेटप्रुफ काच… सलमानने केला खुलासा

Entertainment News

बॉलिवूडच्या तीन खान पैकी एक भाईजान कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे. ईद असो किंवा त्याचा वाढदिवस असो, तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीत येऊन उभा राहत असे. गेल्या ईदला चाहत्यांना शुभेच्छा देण्याकरीता बाल्कनीत आला पण तो बुलेटप्रुफ काचेमागे उभा होता. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. मात्र आता सलमानने बुलेटप्रुफ काच का लावली याबाबत खुलासा केला आहे.

याबाबत आता सलमानने बाल्कनीला बुलेटप्रुफ लावण्यामागचे कारण इतर कोणत्याही कारणासाठी नसून त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्याने खुलासा केला की, चाहते भेटायला आल्यानंतर उत्साहाच्या भरात ते कधी कधी वर चढून बाल्कनीत यायचे. एकदा एक चाहता चक्क सकाळी बाल्कनीत झोपलेला आढळला, त्यामुळे इथे काच लावली असल्याचे सलमानने सांगितले.

काही महिन्यांपूर्वीच सलमानला व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तिने गाडीत बॉम्ब ठेवून उडवून टाकण्याची धमकी दिली. त्यासोबत लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून देखील त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. गेल्यावर्षी त्याच्या वांद्रे येथील निवासस्थान गॅलेक्सीवर गोळीबार करण्यात आला होता. बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोलने घरावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. याच दरम्यान सलमानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Leave a Reply