Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर

BMC Election

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी यंदा आरक्षण सोडतीची जाहीर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु झाली आहे. या आरक्षण सोडतीसाठी पारंपरिक स्वरूपाप्रमाणे यंदाही शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे सोडत काढण्यात आली आहे, ज्यामुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जाते.

प्रशासकीय पार्श्वभूमी
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला, त्यानंतर महापालिकेवर प्रशासक राजवट सुरू आहे. मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. आता निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरु होत असून, २२७ प्रभागांमध्ये आरक्षण आणि खुले प्रभाग यांचे वाटप ठरवून घोषीत करण्यात आले आहे.

आरक्षणाचा तपशील
एकूण २२७ वॉर्ड्स आहेत, त्यापैकी ११४ जागा महिला यासाठी राखीव आहेत.अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग राखीव असून त्यातील ८ महिला आहेत.अनुसूचित जमातींसाठी २ प्रभाग राखीव असून त्यातील १ महिला राखीव आहे.मागासवर्गीय (OBC) साठी ६१ जागा राखीव असून त्यातील ३१ महिलांसाठी राखीव आहेत.इतर सर्वसाधारण वॉर्ड १४९ असून त्यातील ७४ महिला राखीव आहेत.

निवडणुकीसाठी तयारीचे टप्पे
यंदा आरक्षण सोडती ११ नोव्हेंबर २०२५ रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आली.
प्रभागांचे आरक्षण कुठले जात, वर्ग किंवा महिला यासाठी आहे, याचा निवडणूक आयोगाकडून १४ नोव्हेंबरपर्यंत प्रारुप जाहीर होईल.लोकांना १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान या आरक्षण प्रारूपावर हरकतीसाठी संधी दिली जाईल.त्यानंतर हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 15 प्रभागांमध्ये 26, 93, 151, 186, 146, 152, 155, 147, 189, 118, 183, 215, 141, 133, आणि 140 यांचा समावेश आहे. यापैकी 151, 186, 155, 147, 189, 118, 183, आणि 133 हे प्रभाग SC महिलांसाठी आरक्षित आहेत.

मागास प्रवर्ग (OBC) साठी एकूण 61 प्रभाग आरक्षित आहेत. यामध्ये 72, 46, 216, 32, 82, 85, 49, 170, 19, 91, 6, 176, 10, 198, 191, 108, 219, 129, 117, 171, 113, 70, 105, 12, 195, 50, 137, 1, 226, 136, 4, 182, 95, 222, 33, 138, 27, 45, 187, 80, 223, 150, 130, 158, 167, 208, 135, 87, 11, 153, 18, 13, 193, 76, 41, 111, 128, 52, 63, आणि 100 यांचा समावेश आहे. यापैकी अनेक प्रभाग OBC महिलांसाठी आरक्षित आहेत, जसे की 72, 46, 216, 32, 82, 49, 170, 19, 6, 176, 198, 191, 108, 129, 105, 12, 1, 33, 27, 80, 150, 158, 167, 11, 153, 18, 13, 128, आणि 52.

अनुसूचित जमातीसाठी (ST) दोन प्रभाग आरक्षित आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 53 (ST महिला/पुरुष) आणि 121 (ST महिला) यांचा समावेश आहे.
अनेक इच्छुकांचे आणि विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य या आरक्षणामुळे निश्चित झाले आहे. ज्या प्रभागांमध्ये आरक्षण बदलले आहे, तेथील इच्छुकांना आता इतर सुरक्षित जागा शोधाव्या लागणार आहेत, किंवा राखीव नसलेल्या प्रभागात नशीब आजमावावे लागणार आहे.
राजकीय पक्षांना आता त्यांच्या उमेदवारांची निवड आणि प्रचारतंत्र आरक्षणानुसार नव्याने आखण्याची गरज आहे. विशेषतः ओबीसी, एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गासाठी जागा निश्चित झाल्यामुळे, त्या त्या पक्षांना योग्य आणि मजबूत उमेदवार देण्याचे आव्हान असणार आहे.

आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रभाग सीमांकन आणि आरक्षण निश्चित झाल्याने मुंबईतील निवडणुकीचे वातावरण अधिक तापणार असून, पुढील काही दिवसांत हरकती-सूचनांच्या माध्यमातून कायदेशीर आणि राजकीय संघर्षही बघायला मिळू शकतो.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest