अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे बुधवारी भरलेल्या एका AI (Artificial Intelligence) समिटमध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Google, Microsoft सारख्या प्रमुख अमेरिकन टेक कंपन्याना एक स्पष्ट संदेश दिला आहे. या संदेशामध्ये ट्रम्प यांनी इतर देशांतील माणसांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई केली आहे. विशेषत: भारतीय नागरिकांना कामासाठी ठेवणे थांबवून त्यांच्या ऐवजी अमेरिकेतील नागरिकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एआय समिट दरम्यान टेक उद्योगातील जागतिक मानसिकतेवर टीका केली आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील दिग्गज कंपन्या परदेशात नफा मिळविण्यासाठी अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे. तसेच टेक कंपन्याना अमेरिकेने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे चीनमध्ये त्यांचे अनेक कारखाने सुरू केले आहेत, आणि या कारखान्यांमध्ये भारतीय नागरिकांना कामासाठी ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर ट्रम्प यांनी टेक उद्योजकांना पुन्हा एकदा अमेरिकन फर्स्ट पॉलिसीची आठवण करून देत, देशभक्ती आणि राष्ट्रीय निष्ठा दाखवण्याची सूचना केली. तसेच अमेरिकन तंत्रज्ञानाचे अमेरिकन लोकांसाठीच योगदान द्यावे, अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे.
भारतीय IT क्षेत्रासमोरील आव्हान
ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे भारतातील आयटी उद्योग आणि आऊटसोर्सिंग कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. ट्रम्प जर पुन्हा सत्तेत आले, तर ते अमेरिकन स्थानिक भरतीसाठी नियम अधिक कठोर करण्याची शक्यता दर्शवली जात आहे. परिणामी भारतातून होणाऱ्या सॉफ्टवेअर सेवा, BPO, आणि IT सल्लागार कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची चिन्ह आहेत.
ट्रम्प यांच्या या घोषणांनी भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात अस्वस्थता पसरवली आहे. त्यांच्या अमेरिकन प्राधान्य देणाऱ्या भूमिकेमुळे, ‘जागतिक तंत्रज्ञान’ संकल्पना आणि त्यातील बहुराष्ट्रीय सहकार्याला मर्यादा लागू शकतात. पुढील निवडणुकीत ट्रम्प सत्तेवर आले, तर ‘Made in America, For Americans’ हा अजेंडा तंत्रज्ञान आणि रोजगार धोरणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.