पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Lifestyle

पाणी पिण्याच्या योग्य वेळेबाबत वेगवेगळी मतं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही लोक सांगतात की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर काही सांगतात की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काहीजण असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी टाळावं. दुसरीकडे, काहीजण म्हणतात की, तहान लागली तेव्हा पाणी पिणं उत्तम. या वेगवेगळ्या मतांमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, “पाणी प्यायचं तर कधी प्यावं?” याबाबत अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही पद्धतींचं मत वेगळं आहे. चला, दोन्ही पद्धतींच्या सल्ल्याचा अभ्यास करून योग्य वेळ जाणून घेऊ.

अ‍ॅलोपॅथीनुसार पाणी पिण्याची योग्य वेळ : 

अ‍ॅलोपॅथीच्या मते, पाणी पिणं आणि जेवण याचा काही विशेष संबंध नाही. डॉक्टरांच्या मते, एका व्यक्तीचं पोट २५० ते ३५० ग्रॅम अन्नाची क्षमता सहज हाताळू शकतं आणि पोटात पाण्यासाठी पुरेशी जागा असते. जेव्हा पोट अन्नाने भरतं तेव्हा मेंदू “कॅपेसिटी पूर्ण झाली” याचा संकेत देतो. अशा स्थितीत, जेवण झाल्यावर १०० ते २०० मिली पाणी प्यायल्याने काहीही फरक पडत नाही.

आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ :

आयुर्वेदात पाणी पिण्याबाबत विशिष्ट मार्गदर्शन दिलं आहे.

जेवणाआधी पाणी: आयुर्वेदानुसार, जेवणाआधी पाणी पिणं अमृतासमान मानलं जातं.

जेवणादरम्यान पाणी: गरज वाटल्यास, जेवताना थोडं पाणी पिऊ शकता.

जेवणानंतर पाणी: जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणं टाळावं. अशा वेळी पाणी पिणं पचनक्रियेसाठी त्रासदायक ठरू शकतं.

आयुर्वेदातील कारणं:

पचन प्रक्रियेवर परिणाम: जेवणानंतर पाणी प्यायल्याने पचनासाठी तयार झालेली “अग्नि” शांत होते. यामुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी, आणि पोट फुगण्याच्या समस्या होतात.

लठ्ठपणाचा धोका: पचनात अडथळा आल्यामुळे भूक लवकर लागते आणि वारंवार खाणं सुरू होतं, ज्यामुळे वजन वाढू शकतं.

पोषक घटक शोषण: जेवणानंतर पाणी प्यायल्यास अन्नातून मिळणारे पोषक घटक योग्य प्रकारे शोषले जात नाहीत.

आता तुम्ही कोणत्या बाजूने आहात अ‍ॅलोपॅथी च्या बाजूने की आयुर्वेदाच्या बाजूने आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *