War Without War : अमेरिकेचे इराणवर दबावतंत्र

अमेरिकेने आपले Massive Armada इराणच्या समुद्रात उभे केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून दोन्ही देशांमधील संबंध संशय, संघर्ष आणि अप्रत्यक्ष युद्धांनी भरलेले आहेत. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शीतयुद्धांना पूर्ण विराम देण्याचे ठरवले असल्याचे दिसते. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेची भूमिका अधिक आक्रमक आणि दबावतंत्रावर आधारित झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

इराण – अमेरिकेतील संघर्ष
इराण हा केवळ एक देश नाही, तर मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या वर्चस्वाला थेट आव्हान देणारी शक्ती आहे. अमेरिकेचा इराणशी युद्ध करण्यामागे काही मुख्य कारणे आहेत. त्यातील गंभीर आणि महत्वाचे कारण म्हणजे Nuclear Programme. ट्रम्प यांचा ठाम दावा आहे की इराण असे अण्वस्त्र विकसित करत आहे जे संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र इराण अमेरिकेच्या या दाव्याला खोटे ठरवत त्यांचा nuclear programme कुणाला ही धोका ठरू शकणार नाही असे सांगत आहे.

इराण थेट युद्ध न करता प्रतिनिधी संघटनांमार्फत आपली ताकद वाढवत आहे. या संघटनांमध्ये लेबनॉनमधील हिज्बुल्ला, इराकमधील शिया मिलिशिया, येमेनमधील हूथी बंडखोर यामुळे मध्य पूर्वेत अमेरिकेचा प्रभाव कमी होत असल्याची जाणिव होत आहे. यामुळे अमेरिका इराणला Axis of Resistance चा केंद्रबिंदु मानत आहे आणि ते मोडून काढण्याकरीता प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर इराणकडे प्रचंड प्रमाणात तेल, नैसर्गिक वायू, महत्वाचे खनिज साठे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जिथून जगातील मोठ्या प्रमाणात तेलवाहतूक होते ते असल्यामुळे अमेरिकेला इराणची संपत्ती आणि भौगोलिक स्थानावर वरचस्व असल्याचे खामेनेई यांनी स्पष्ट म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या अटी
ट्रम्प यांची भूमिका करार किंवा परिणाम अशी दिसून येत आहे. यामध्ये इराणणे अण्वस्त्र विकसित करू नये. प्रादेशिक प्रभाव कमी करावा किंवा अमेरिकेच्या अटींवर नवीन अणवस्त्र करार मान्य करावा अशा आहेत. पण हा करार समान पातळीवरचा नसून, एकतर्फी दबाब आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे इराणचे म्हणणे आहे.

Massive Armada
ट्रम्प यांनी इराणजवळ भली मोठी नौदल ताकद तैनात केली आहे. यामध्ये अत्याधुनिक युद्धनौका, विमानवाहू जहाजे, मिसाईल सिस्टिम्स यांचा समावेश आहे. गेले तीन दिवस हे इराण जवळील समुद्रात तैनात आहेत. यावरून अमेरिकेचा इराणवर Psychological Pressure टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. इराणला सतत युद्धाची भीती दाखवून घाबरवायचे. “युद्ध टाळायचं असेल तर करार करा” असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. “We’ll Make a deal… Otherwise we’ll see what happens.” असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. “war without war” अशी ट्रम्प यांची रणनीती आहे.

इराणची भूमिका
खामेनेई यांनी ट्रम्प यांना आव्हान देत सांगितले आहे की, इराण युद्ध सुरू करणार नाही पण हल्ला झाला तर जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल.

इराण – अमेरिकेचा संघर्षात्मक इतिहास
इराण – अमेरिकेचे संघर्षात्मक संबंध फार पूर्वी पासून आहेत. सुरूवातीला 1950-1960 च्या दशकात दोन्ही देशांची रणनीतिक सहकार्याची भूमिका होती. ज्यामध्ये अमेरिकेने इराणमध्ये ब्रिटिश आणि सोव्हिएत संघाच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी मदत केली यानंतर 1955 मध्ये दोन्ही देशांनी मित्रत्व करार केला होता. परंतू 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीने सहकार्याची भूमिका पूर्णपणे बदलून टाकली. या क्रांतीत अमेरिके विरोधी अनेक धोरणे करण्यात आली आणि त्यानंतर इराणमधील विद्यार्थ्यांनी अमेरिकन दुतावासावर हल्ला करून 52 अमेरिकी कुटुंबीयांना 444 दिवस ओलीस ठेवले होते. या Hostage Crisis मुळे दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध संपुष्टात आले.

या घटनेमुळे अमेरिकेने इराणविरोधात आर्थिक निर्बंध लागू केले आणि मध्य पूर्वेतील धोरणात्मक पातळीवर इराणला जगभरातून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला. 2025 मध्ये अमेरिकेने इराणच्या काही अणुस्थळांवर हल्ले केले. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला असून आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *