RBI News: नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटवणार ?

RBI News RBI News

Mahatma Gandhi’s Photo will Not be Printed on Currency Notes :भारताचं चलन म्हणजे आपला रुपया. जगात प्रत्येक देशाचं स्वतःचं चलन असतं, पण भारतीय नोटांची एक खास ओळख म्हणजे प्रत्येक नोटेवर महात्मा गांधींचा फोटो असतो. ₹५ पासून ₹५०० पर्यंतच्या सर्व नोटांवर गांधीजींचं चेहऱ्यावरचं ते शांत हास्य दिसतं. अगदी खोट्या नोटांवरही तोच फोटो छापला जातो.

मात्र, अलीकडे सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की, भारतीय नोटांवरून गांधीजींचं छायाचित्र हटवण्यात येणार आहे. अनेकांनी “नवीन नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे फोटो येणार” असा दावा केला. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये गोंधळ पसरला.

RBIचा स्पष्ट खुलासा

या चर्चांवर अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. RBIने सांगितलं आहे की, गांधीजींचा फोटो हटवण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव सरकारकडे नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्व अफवा निराधार आहेत. RBIच्या म्हणण्यानुसार, सध्या कोणत्याही नव्या नोटा गांधीजींच्या फोटोविना जारी करण्याचा विचार होत नाही. त्यामुळे भारतीय चलनावर महात्मा गांधींची प्रतिमा कायम राहणार आहे.

चर्चेची सुरुवात कशी झाली ?

या अफवेची सुरुवात एका न्यूज रिपोर्टमुळे झाली. त्यात म्हटलं होतं की, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) यांनी IIT दिल्लीचे प्राध्यापक दिलीप साहा यांना तीन वेगवेगळ्या वॉटरमार्क नमुन्यांचे संच पाठवले होते.
या नमुन्यांमध्ये महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची छायाचित्रं होती. त्यापैकी एक संच निवडण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र हे केवळ तांत्रिक अभ्यासासाठी होतं. याचा अर्थ असा नाही की गांधीजींचा फोटो काढून टाकला जाणार आहे.

डिजिटल रुपया आणि गांधीजींचं छायाचित्र

RBIने अलीकडेच “डिजिटल रुपया” नावाची इलेक्ट्रॉनिक चलनप्रणाली सुरू केली आहे. ही पूर्णपणे ऑनलाइन असल्याने त्यावर कोणतंही छायाचित्र किंवा डिझाईन नसतं. त्यामुळे काहींना वाटलं की गांधीजींचा फोटो काढण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात डिजिटल रुपया हे वेगळ्या स्वरूपाचं चलन असल्याने त्यावर कोणतंही चित्र नसतं.

भारतीय नोटांवर गांधीजींचा फोटो कधी आला?

महात्मा गांधींचं छायाचित्र पहिल्यांदा भारतीय नोटांवर १९६९ साली आलं. त्या वर्षी त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष मालिकेच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या, ज्यावर सेवाग्राम आश्रमातील गांधीजींचं छायाचित्र होतं. नंतर १९८७ साली ₹५००च्या नोटेवर पुन्हा त्यांचा फोटो छापण्यात आला आणि त्यानंतर तो भारतीय चलनाचा कायमचा भाग बनला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *