बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लवकरच आई-बाबा होणार असल्याची माहिती सोशल मीडिया द्वारे दिली होती. आता या जोडप्याला पुत्ररत्न झाले असून याबाबत विकीने फोटो शेअर करत माहिती दिली आहे. या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी महिनाभरा पूर्वीच ते आई-बाबा होणार असल्याची माहिती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली होती. शुक्रवारी दि. 7 नोव्हेंबर रोजी विकीने ही इंस्टाग्रामवर बाबा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
बॉलिवूडमधील यशानंतर कतरिनाने ब्रेक घेत स्वत:चा व्यवसाय सुरू केला. 2021 मध्ये कतरिना आणि विकी विवाहबंधनात अडकले. वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना आई झाली आहे.
विकीने शेअर केलेल्या फोटोवर बॉलिवूडमधील दिग्गजांकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत. तर चाहत्यांनी देखील अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे. या जोडप्यावर शुभेच्छा आणि आशिर्वांदाचा वर्षाव होत आहे.
