मूळ नेपाळचं असलेलं एक जोडपं म्हणजे विवेक आणि सृजना. विवेक यांचं ब्रेन कॅन्सर मुळे काही दिवसांपूर्वी निधन झालं. पण या जोडप्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादाई ठरला.
गेल्या काही दिवसात सोशल मिडिया वर लग्न, नातेसंबंध या सगळ्या बाबतीत वेगवेगळी मतं समोर येत होती. आणि त्याला कारण म्हणजे बेंगळूरू येथील अतुल सुभाष याने पत्नीकडून झालेल्या त्रासामुळे केलेली आत्महत्या. या सगळ्या वातावरणात विवेक आणि सृजना यांनी मात्र लोकांसमोर एक आदर्श ठेवला.
विवेक आणि सृजना यांनी प्रेम विवाह केलेला आणि त्यानंतर हे दोघेही अमेरिकेत आले होते. अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठात Physic मध्ये PHD करत असलेल्या विवेक यांनी याच काळात यूजीए नेपाळी स्टुडंट असोसिएशन साठी अनेक कामे केली. हे सगळं सुरु असतानाच २०२३ साली मात्र त्यांना स्टेज थ्री कॅन्सर झाल्याचं समजलं. तिथून पुढचा काळ या जोडप्यासाठी संघर्षाचा होता. सृजना यांनी तिथून पुढचा सगळा वेळ विवेक यांची काळजी घेण्यासाठी दिला. हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या चकरा, treatment, केमो थेरपी या प्रत्येक वेळी सृजना विवेक यांच्या सोबत उभ्या राहिल्या.इतकचं नाही तर treatment च्या काळात जेव्हा विवेक यांना केस कापावे लागले त्यावेळी सृजना यांनीसुद्धा त्यांचे केस कमी केले. दोघांनी हॉस्पिटल मध्येच वाढदिवस साजरा केला. एकमेकांना जितके आनंदाचे क्षण देता येतील तितके आनंदाचे क्षण दिले. जास्तीत जास्त वेळ त्यांनी एकमेकांसोबत घालवला.
सृजना आणि विवक यांची गोष्ट सोशल मिडिया वर बरीच viral देखील झालेली. सृजना यांनी मधल्या काळात cancer आधी आणि cancer नंतर असा एक फोटो सोशल मिडिया वर टाकलेला त्यांचा हा फोटो सुद्धा खूप viral झाला होता. सृजना यांनी विवेकला जितके उपचार शक्य असतील ते मिळवून देण्याचे प्रयत्न केले. पण अखेर विवेक यांची कॅन्सर सोबतचची झुंज अपयशी ठरली.
पण त्यांच्या या प्रेम कहाणीने अनेकांना एकमेकांसाठी उभं रहाण्याची, कुठल्याही परिस्थितीत एकमेकांसोबत रहाण्याची प्रेरणा मात्र दिली.