मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल नेहा पेंडसे नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि मादक अंदामुळे चर्चेत असते. आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत. या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसेने ऑफ शोल्डर व्हाइट रंगाचा वन पीस घातला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात गोल्डन रिंगचे इअररिंग्स घातले आहेत. नेहा पेंडसे या फोटोत खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. नेहाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९९ मध्ये ‘प्यार कोई खेल नहीं’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मे आय कम इन मॅडम?’ (May I Come In Madam?) आणि ‘भाभीजी घर पर है!’ (Bhabiji Ghar Par Hain!) यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत, ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.




