तहव्वूर राणा कोण आणि त्याचं प्रत्यार्पण महत्वाचं का ?

News

२६/११ हल्ला म्हणजे भारतीयांसाठी एक अशी जखम जी कधीच भरून निघणार नाही. या ६० तासांपेक्षा जास्त चाललेल्या आतंकवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ निष्पाप जीव मारले गेले आणि या काळ्या दिवसाचा कर्ता करविता म्हणजे तहव्वूर राणा.

तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आहे, ज्याच्यावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप आहे. राणा हा लष्कर-ए-तोयबाच्या ‘दाऊद गिलानी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी हेडलीचा सहकारी मानला जातो, ज्याने मुंबईतील हल्ल्याच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2008 च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यात तो सरकारी साक्षीदार बनला आहे. हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी तो यूएसमध्ये 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. राणाने या डेव्हिड हेडलीसह मुंबईतील हल्ल्याच्या ठिकाणांचा शोध घेतला होता आणि हल्ल्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केली होती.


२००९ मध्ये, राणाला अमेरिकेच्या शिकागो शहरातून एफबीआयने अटक केली. त्याच्यावर पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा आरोप आहे. अमेरिकेतील न्यायालयांमध्ये विविध कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने राणाला भारतात प्रत्यार्पित करण्यास मान्यता दिली.
राणाने या निर्णयाविरुद्ध अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, परंतु नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. यानंतर, जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली.
राणाच्या प्रत्यार्पणामुळे २६/११ हल्ल्याच्या तपासाला नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. राणाच्या प्रत्यार्पणामुळे या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *