कलमा पाठांतराची जबरदस्ती करणाऱ्या ‘हॅप्पी पंजाबी’ उर्फ इरफानवर धर्मांतर, गर्भपात आणि अत्याचाराचे गंभीर आरोप

कलमा पाठांतराची जबरदस्ती करणाऱ्या ‘हॅप्पी पंजाबी’ उर्फ इरफानवर धर्मांतर, गर्भपात आणि अत्याचाराचे गंभीर आरोप

मध्य प्रदेशातील इंदौर येथे माणूसीकाला काळिमा फासणार प्रकार उघडकीस आला आहे. इंदौर येथे नोकरीच्या शोधात आलेल्या एका 21 वर्षीय तरूणीवर इरफान अली नावाच्या इसमाने अमानुष अत्याचार केले असल्याची घटना समोर आली आहे.

पीडिता मूळची राजस्थानची असून ती इंदौरच्या निपानिया भागात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. विजयनगर येथे तिने दिलेल्या तक्रारीनुसार, मे 2023 मध्ये इरफान अलीने स्वत: ची ओळख हॅप्पी पंजाबी या नावाने करून दिली होती. चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तिला एका हॉटेलमध्ये बोलावले, कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध टाकून तिला पाजले. बेशुद्धा अवस्थेत तिच्यावर अत्याचार केले. सकाळी स्वत:ला नग्नावस्थेत असल्याने अत्याचार झाल्याचे ओळखले. विरोध केल्यावर आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ दाखवून धमकावले व सतत ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवले.

2024 दरम्यान हॅप्पी पंजाबी पीडितेला कुठेतरी घेऊन जात असताना रिक्षावाल्यासोबत झालेल्या भांडणात तो मुस्लीम असल्याचे समजले. तेव्हा त्याने त्याचे खरे नाव इरफान अली असल्याचे पीडितेला सांगितले. तसेच मी मुस्लीम आहे, तुलाी मुसलमान व्हावं लागेल असे धमकावले. यानंतर पीडीता घाबरून राजस्थानला पळून गेली. काही महिन्यांनी म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये ती पुन्हा इंदौरमध्ये परतल्यानंतर धमक्या आणि धर्मांतर करण्याचा तिच्यावर दबाव टाकण्यात आला.

जून 2025 मध्ये इरफानने तिला एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवले आणि वारंवार तिच्यावर अत्याचार केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. मूल नको असल्याने त्याने जबरदस्ती औषध देऊन तिचा गर्भपात केला. ऑक्टोबर 2025 पर्यंत तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. त्याच्या अत्याचारांना कंटाळून अखेर कुटुंबीयांच्या मदतीने आणि करणी सेनेच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, आरोपी तिला कलमा पठण आणि मुस्लिम प्रार्थना म्हणण्यास भाग पाडत असे. पाठांतर न झाल्यास अमानूष मारहाण करत असे. तसेच रोजा पाळण्यास आणि बुरखा घालण्यास देखील दबाव टाकत असे. तिने नकार दिल्यानंतर जास्त हुशारी केलीस तर जीव घेईन अशी देखील धमकी देत असे. सिगारेटचे चटके देणं, मारहाणं करणं सातत्याने सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान अली हा पूर्वीपासून गुन्हेगार असून त्याच्यावर 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला जिल्ह्यातून तडीपार देखील करण्यात आले आहे व रासुका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे, तो इंदौरमध्ये ड्रग्स पार्ट्या आयोजित करून मुलींना जाळ्यात अडकवत असे, त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून नंतर त्यांना ब्लॅकमेल करत असे. पोलिसांनी बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती धर्मांतराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *