Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

टिळकांनी काँग्रेस का सोडली? | पुण्याच्या राजकारणात भूकंप ! | Rohit Tilak Resigns Congress

Image: Rohit Tilak
Image: Rohit Tilak

पुण्याच्या राजकारणात भूकंप !

लोकमान्य टिळकांचे खापरपणतू रोहित टिळक यांनी अखेर काँग्रेसला रामराम म्हणण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. पण त्यांनी काँग्रेस का सोडली? आणि त्यांचा पुढचा मुक्काम ‘धनुष्यबाण’ आहे का?

रोहित टिळक यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यात चर्चांना उधाण आलंय. एका मुलाखतीत त्यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर निशाणा साधलाय. त्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ जाहीर झाला, तेव्हापासून काँग्रेसने टिळक कुटुंबापासून लांब राहायला सुरुवात केली. १ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित होते, पण काँग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. तेव्हापासूनच रोहित टिळकांची पक्षात कोंडी होत असल्याची चर्चा होती. टिळकांचा सवाल रोखठोक आहे…

ते म्हणतात, “हा पुरस्कार कार्याचा सन्मान असतो, पक्षाचा नाही. याआधी इंदिरा गांधी आणि प्रणव मुखर्जींनाही हाच पुरस्कार दिला होता, मग मोदींच्या नावावर आक्षेप का?”

रोहित टिळक हे लोकमान्य टिळकांचे खापरपणतू आणि दिवंगत ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा परिणाम केवळ राजकारणावर नाही, तर सांस्कृतिक वर्तुळावरही होईल.

तुम्हाला काय वाटतं, आता कसब्याच्या राजकारणात टिळकांची ही ‘एन्ट्री’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकद किती वाढवणार, कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स साठी फॉलो करा जबरी खबरी.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest