हसतमुख चेहरा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. खरं तर, हसू हेच चेहऱ्याचं खरं सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे. मात्र दात पिवळे दिसत असतील तर हसताना नकळत संकोच जाणवू शकतो. अलिकडे बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना चहा, कॉफी, तंबाखू, धुम्रपान किंवा जास्त साखरयुक्त पदार्थ खाण्याची सवय असते. यामुळे दातांवर पिवळसर थर बसतो. नियमित ब्रश करूनही दात चमकत नाहीत. म्हणूनच अनेक जण दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या टूथपेस्ट्स किंवा महागडे डेंटल ट्रीटमेंट्स वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरच्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे मीठ आणि लिंबू व आणखी काही पदार्थ दातांवरील पिवळसर थर काढून टाकण्यात तितकेच प्रभावी ठरू शकतात?
पूर्वीच्या काळी जेव्हा टूथपेस्ट ब्रश सारखे प्रकार नव्हते. तेव्हा कडूलिंबाच्या झाडाचे खोड वापरून दात घासले जात असत. त्याच बरोबर आणखी काही घरगुती वापरले जात होते. त्यापैकीच एक म्हणजे मीठ आणि लिंबू. मीठामध्ये एक क्लिनिंग एजंट असतो. जो दातांवरील प्लाक आणि पिवळाथर काढून टाकण्यास मदत करतो. लिंबातील सायट्रिक अॅसिड दातांलवरील घाण आणि डाग साफ करतो. ज्यामुळे दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होते.
जुन्या काळापासून वापरला जाणारा हा उपाय अजूनही प्रभावी आहे. यासोबतच जर मोहरीच्या तेलात मीठ मिसळून हलक्या हाताने दातांवर चोळल्यास दातांवरचा पिवळसरपणा कमी होऊन हिरड्या मजबूत व्हायला मदत होते.
तिसरा उपाय म्हणजे स्ट्रॉबेरी पल्प. यामध्ये असलेले मॅलिक अॅसिड दातांवरील डाग काढण्यास मदत करते. पिकलेल्या स्ट्रॉबेरीचा गर दातांवर लावून 5 मिनिटांनी ब्रश केल्यास एका आठवड्यानंतर तुम्हाला त्याचा परिणाम जाणवू लागेल. या सगळ्यासोबतच आहारामध्ये फळे आणि भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. सफरचंद, गाजर, काकडी यांसारख्या कुरकुरीत फळ भाज्या खाल्ल्याने दात स्वच्छ राहतात आणि पिवळसरपणा कमी होईल.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…