News

Narendra Modi : नरेंद्र मोदीच नसते तर….

Narendra Modi Birthday 2025 : ‘मै नरेंद्र दामोदरदास मोदी… शपथ लेता हूं की…’ आणि २०१४ पासून भारताच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला. नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आणि देशाच्या विकासाचा मार्ग एका वेगळ्याच गतीने पुढे सरकला. आज भारत जगाच्या रंगमंचावर केवळ सहभागी नाही, तर नेतृत्व करणारा देश ठरला आहे. पण तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदीच जर नसते, ते पंतप्रधान झाले नसते तर भारत पुढे गेला असता का? हा प्रश्न खरं तर आपल्याला विचार करायला लावणारा आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एका भाषणामध्ये सांगितलेलं ‘जेव्हा आम्ही १रुपया नुकसानभरपाई देतो, तेव्हा १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचतात.” भ्रष्टाचार, पैसे खाणं ही भारताच्या प्रगतीला लागलेली कीड नरेंद्र मोदी यांनी संपवायला घेतली. डिजिटल इंडिया (Degital India) ही संकल्पना नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय आंदोलन बनवली. २०१४ पूर्वी डिजिटल व्यवहार ही केवळ शहरी मर्यादित गोष्ट होती. आज मात्र ग्रामीण भागातील छोटा दुकानदारसुद्धा QR कोड स्कॅन करून पेमेंट घेतो. UPI प्रणालीमुळे भारत जगातील सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणारा देश ठरला. जनधन योजना, आधार आणि मोबाईल या “जॅम” ट्रिनिटीमुळे शासकीय सेवा थेट नागरिकांच्या हातात पोहोचल्या. डिजिलॉकर, भीम अ‍ॅप, आधार पे यांसारख्या सुविधांनी नागरिकांचे जीवन सोपे झाले. मोदी नसते तर भारत अजूनही रोख पैशांवर अवलंबून राहिला असता. आणि नुकसानभरपाई कॅशमध्ये आली असती.

सामान्य जनतेच्या जीवनमानात बदल घडवणाऱ्या योजनांचा उल्लेख केला तर मोदींचे कार्य अधिक ठळक होते. उज्ज्वला योजनेमुळे महिलांना धुरामुक्त स्वयंपाकघर मिळाले. प्रधानमंत्री आवास योजनामुळे लाखो कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले. आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांना आरोग्यसेवेचे कवच मिळाले. स्वच्छ भारत अभियानाने देशातील स्वच्छतेबद्दल जनजागृती केली आणि लाखो शौचालये उभारली. जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भागात नळाचे शुद्ध पाणी पोहोचले. प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली. PM किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पोहोचली. मोदी नसते तर या मूलभूत सुविधा लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या नसत्या.

जागतिक स्तरावर भारताला मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन ओळख मिळाली. भारताने G20 अध्यक्षपद मोठ्या दिमाखात पार पाडले. अमेरिका, रशिया, युरोप ते मध्यपूर्व – प्रत्येक राष्ट्र भारताला विश्वासार्ह भागीदार मानू लागले. इंटरनॅशनल सोलर अलायन्ससारख्या उपक्रमांनी भारताला हवामान बदलासारख्या महत्त्वाच्या विषयांवर जागतिक नेतेपद दिले. चंद्रयान-३च्या यशामुळे भारत अंतराळात नवे शिखर सर करणारा ठरला. मोदी नसते तर भारत अजूनही मोठ्या शक्तींच्या मागे राहिला असता. अंतराळात भारताने पाऊल ठेवलेही नसते. जेव्हा मनमोहनसिंह पंतप्रधान होते तेव्हा पक्षातील काही नेतृत्वांमुळे ते कायम मागे राहिले. २००८ ला मुंबई बॉम्ब हल्ल्यात आपण अमेरिकेकडे मदत मागायला गेलेलो. पण आज हाच नरेंद्र मोदी यांनी घडवलेला भारत आहे, जो ऑपरेशन सिंदूर, पुलवामा, उरी, सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूंच्या घरात घुसून मारत आहे. डरपोक नाही तर शत्रूंना घाम फोडत आहे.

आत्मनिर्भर भारताचा मंत्र आज प्रत्येक क्षेत्रात दिसतो. मेक इन इंडियामुळे मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत आघाडीवर पोहोचला. कोविड काळात भारताने “व्हॅक्सीन मित्र” बनून अनेक देशांना मदत केली. स्टार्टअप इंडियामुळे हजारो तरुण उद्योजक जगभरात नावारूपाला आले. मुद्रा योजनेमुळे लघु व मध्यम उद्योगांना भांडवल मिळाले. कौशल्य भारत अभियानामुळे लाखो तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाल्या. मोदी नसते तर भारत इतका सक्षमपणे जगासमोर उभा राहिला नसता.

इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासातही भारताने झपाट्याने प्रगती केली. भारत माला प्रकल्मुपाळे महामार्गांचे जाळे उभे राहिले. सागरमाला प्रकल्पामुळे बंदरांचा विकास झाला. वंदे भारत एक्सप्रेसने भारतीय रेल्वेला आधुनिक रूप दिले. मेट्रो प्रकल्प अनेक शहरांमध्ये वास्तव झाले आणि स्मार्ट सिटीज मिशनमुळे शहरीकरणाला नवे रूप मिळाले. UDAN योजनामुळे प्रादेशिक हवाई सेवा स्वस्त व सुलभ झाल्या. मोदी नसते तर भारत अजूनही जुनी व्यवस्था सांभाळण्यातच गुंतलेला असता. बहुतांश शहरांमध्ये आज विमानतळ उभी राहू शकली, ती नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीमुळेच.

भारतीय संस्कृतीला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणे हे मोदींचे मोठे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आज जगभर साजरा होतो. काशी विश्वनाथ धाम, सोमनाथ मंदिर विकास, राममंदिर यामुळे भारतीय परंपरा व श्रद्धेला जागतिक मंच मिळाला. मोदी नसते तर भारतीय संस्कृतीचा हा अभिमान इतक्या भव्य पातळीवर पोहोचला नसता. अगदी भारतात राहूनही हिंदूंना जीव मुठीत घ्यावा लागला असता. पण आज हिंदू जागा झाला आहे, निर्भर झाला आहे , तो नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्वाच्या मंत्रामुळेच.

विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात भारताची झेप जगाला थक्क करणारी ठरली. चंद्रयान-३ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतिहास रचला. आदित्य-एल१ मिशनमुळे आपण थेट सूर्याचाच अभ्यास करण्यास सिद्ध झालो आहोत. ISRO आज जगातील अग्रगण्य अंतराळ संस्था ठरली. गगनयान मिशनसाठी भारत सज्ज झाला. नरेंद्र मोदी नसते तर ही वैज्ञानिक झेप इतक्या झपाट्याने घेता आली नसती.

२०१४ ते २०२५ हा काळ भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग ठरला आहे. भारत डिजिटल आहे, आत्मनिर्भर आहे, सामर्थ्यवान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगाला दिशा देणारा देश आहे. हे सर्व शक्य झाले कारण भारताला एक द्रष्टा नेता लाभला – नरेंद्र दामोदरदास मोदी. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण अभिमानाने म्हणू शकतो – “नरेंद्र मोदी आहेत म्हणून भारत आज इतका उंच भरारी घेऊ शकला.”

Team Jabari Khabari

Recent Posts

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

3 minutes ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

3 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

4 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

22 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

23 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago