Jabari Khabari

डॉक्टरांचे Handwriting ठरले 7 हजार मृत्यूंचे कारण! सुवाच्च अक्षरात Prescription लिहिणे आता बंधनकारक

News

Doctor handwriting issues: सध्याच्या काळात लिखाण खूप कमी झाले आहे. प्रत्येकजण टेक्नोसेव्ही झाल्याने लिहिण्यासाठी कीबोर्डचा वापर करतात. परंतु, डॉक्टरांच्या लिखाणाला खूप महत्त्व आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. अनेक डॉक्टरांचे हस्ताक्षर खूप वाईट असतात आणि ते केवळ औषध विक्रेत्यालाचा कळतात. जगभरात डॉक्टरांच्या हस्ताक्षरावरून अनेक विनोदही केले जातात. परंतु, न्यायालयाच्या निकालानुसार हा विनोदाचा विषय नाही. याबाबतचे महत्त्व न्यायालयाने अधोरेखित केले आहे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नुकताच यावर निकाल दिला आहे. वाचता येईल असे वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मूलभूत हक्क असल्याचे न्यायालयाचे म्हणने आहे. यामुळे जीवन आणि मृत्यूचा फरक पडू शकतो, असेही न्यायालयाचे म्हणणे आहे. न्यायालयाने नक्की काय निकाल दिला? अक्षरात सुधारणा करण्याचे निर्देश का देण्यात आले? नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात…

न्यायालयाच्या आदेशात काय?
न्यायालयाने हा आदेश महिलेच्या एका फसवणूक प्रकरणावर सुनावणी करताना दिला आहे. यात एका महिलेने बलात्कार, फसवणूक आणि बनावटगिरीचे आरोप केले होते. न्यायमूर्ती जसगुरप्रीत सिंग पुरी यांनी संबंधित पुरुषाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना हा आदेश दिला. संबंधित पुरुषाने सरकारी नोकरीचे आश्वासन देऊन आपल्याकडून पैसे घेतले, तिच्या बनावट मुलाखती घेतल्या आणि तिचे लैंगिक शोषण केले, असा महिलेचा आरोप होता. आरोपीने मात्र हे आरोप फेटाळून लावले. त्यांचे संबंध परस्पर संमतीने होते आणि पैशांच्या वादातून हा खटला दाखल करण्यात आला, असे त्याने सांगितले.

न्यायमूर्ती पुरी यांनी जेव्हा महिलेची तपासणी करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी लिहिलेला वैद्यकीय कायदेशीर अहवाल पाहिला, तेव्हा तो त्यांना समजला नाही. “त्यातला एक शब्द किंवा एक अक्षरही स्पष्टपणे वाचण्यायोग्य नव्हते,” असे त्यांनी आदेशात लिहिले आहे. “ज्या काळात तंत्रज्ञान आणि संगणक सहज उपलब्ध आहेत, अशा वेळी सरकारी डॉक्टर अजूनही हाताने प्रिस्क्रिप्शन लिहीत आहेत, हे प्रिस्क्रिप्शन काही औषध विक्रेत्यांना सोडल्यास कोणालाही वाचता येत नाही, हे धक्कादायक आहे,” असे न्यायालयाने म्हटले.

डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षरामुळे उद्भवू शकतो गंभीर धोका
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन (IoM) च्या १९९९ च्या अहवालानुसार, वैद्यकीय चुकांमुळे अमेरिकेत दरवर्षी अंदाजे किमान ४४,००० मृत्यू झाले, त्यापैकी ७,००० मृत्यूंना डॉक्टरांचे खराब हस्ताक्षर कारणीभूत होते. अलीकडे, स्कॉटलंडमध्ये एका महिलेला डोळ्यांची समस्या होती आणि तिला चुकून दुसरे क्रीम दिल्याने तिला जखमा झाल्या. ब्रिटनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे की, “औषधांच्या चुकांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि मृत्यू झाले आहेत. रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रिस्क्रिप्शन प्रणाली सुरू केल्यास चुका ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात”.

Leave a Reply