News

Navaratri 2025: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे सुरु झाला सार्वजनिक नवरात्रोत्सव ! वाचा सविस्तर

Navaratri 2025 : आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला हा प्रश्न विचारला, तर आपण लगेच लोकमान्य टिळकांचे नाव घेतो. पण सार्वजनिक नवरात्रोत्सव कोणी सुरु केला हे आपल्याला माहीत नसतं. गरबा, दांडिया खेळायला आवडतं पण प्रथम सार्वजनिक नवरात्रोत्सव का सुरु केला हे आपल्याला माहीत नसतं. काहीतर गुजरातला नवरात्रोत्सव सुरु झाला म्हणतील! पण तुम्हाला माहीत आहे का? ब्राह्मण-दलित वादातून पहिला नवरात्रोत्सव सुरु झाला. कधी स्थापन झाली पहिली सार्वजनिक देवी आणि का सुरु झाला हा उत्सव जाणून घेऊया….

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय, बंडखोर आणि सुधारक व्यक्तिमत्व. त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता, परंतु जातीभेद, अस्पृश्यता आणि अनिष्ट रूढी यांचा त्यांनी कडाडून विरोध केला. हिंदू धर्माची खरी ताकद म्हणजे त्याची सर्वसमावेशकता; परंतु उच्चवर्णीयांच्या संकुचित विचारांमुळे ती नष्ट होत असल्याची ठाम टीका त्यांनी आपल्या लेखनातून व कृतीतून केली.

नक्की वाचा
‘एक Xerox दे ना’ म्हणणाऱ्यांनो झेरॉक्स म्हणजे काय माहीत आहे का? उत्तर ऐकून पुन्हा नाही मागणार झेरॉक्स
Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Navaratri 2025 : फॅशन की अध्यात्म? नवरात्रीच्या नऊ रंगाची  स्टोरी… 

दादर सार्वजनिक गणेशोत्सवातील संघर्ष

सन 1926 मध्ये प्रबोधनकार ठाकरे पुण्यातून मुंबईत आले. दादर हा त्या काळचा मध्यमवर्गीय मराठी समाजाचा गजबजलेला भाग होता. येथे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असे. मात्र या उत्सवाच्या समितीत ब्राह्मणेतरांना प्रवेश नव्हता. दलित तरुणांना गणेशमूर्तीची पूजा करण्यासही बंदी घालण्यात आली होती.

या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी रावबहादूर सीताराम केशव बोले (सी.के. बोले) यांच्या नेतृत्वाखाली दलित तरुणांनी आंदोलन केले. पोलिसांचा हस्तक्षेप, गोंधळ आणि तणावाच्या वातावरणात काहीशी तडजोड झाली. ब्राह्मण पुजाऱ्याने पूजा केली, तर एका जेष्ठ दलित कार्यकर्त्याने गणेशाला गुलाबाचा गुच्छ अर्पण केला. मात्र या तडजोडीवर प्रबोधनकार समाधानी नव्हते. त्यांच्या मते, सार्वजनिक उत्सव खऱ्या अर्थाने अखिल समाजाचा असायला हवा.

कॅन्सर नेमका कशामुळे होतो ? ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या ! जाणून घ्या

सार्वजनिक नवरात्र महोत्सवाची संकल्पना

या अनुभवातून त्यांनी नवा विचार मांडला – “महाराष्ट्राची खरी राष्ट्रीय देवी म्हणजे भवानी. शिवरायांच्या काळापासून नवरात्रोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. त्याचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे.”

या विचारातूनच दादरमध्ये ‘लोकहितवादी संघ’ स्थापन करून 1926 मध्ये पहिल्यांदा ‘श्री शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ सुरू करण्यात आला.

पहिला नवरात्र महोत्सव : दादर 1926

या उत्सवात सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा सहभाग होता.

  • घटस्थापनेचा मान एका गरीब दलित दाम्पत्याला देण्यात आला.
  • प्रख्यात कविवर्य वसंत बिहार ऊर्फ जोशी यांनी देवीची आरती रचली.
  • दादरच्या काळ्या मैदानावर 80 फूट लांब आणि 60 फूट रुंद मंडप उभारला गेला.
  • शिवरायांचा भगवा झेंडा दलित आमदार सोळंकी यांच्या हस्ते फडकावण्यात आला.
  • महिला व्याख्याते म्हणून सौ. यमुनाबाई घोडेकर यांचे व्याख्यान विशेष गाजले.

दसऱ्याच्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, मलखांब, भजनी फड, शाहीर, कीर्तनकार – अशा विविध ताफ्यांनी मिरवणूक सजली. रा. ब. बोले यांच्या हस्ते सुवर्णपूजन झाले. डॉ. आंबेडकरांनीही भाषण केले.

परंपरेचा विस्तार

प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेला हा सार्वजनिक नवरात्रोत्सव लवकरच संपूर्ण मुंबईत आणि त्यानंतर महाराष्ट्रभर पसरला. गेल्या नव्वद वर्षांत उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी त्यामागील मूळ उद्दिष्ट आजही महत्त्वाचे आहे. समाजातील भेदभाव दूर करणे, परंपरेला सामाजिक आशय देणे, समाजघटकांना समान स्थान देणे यामुळे सार्वजनिक नवरात्रोत्सव महत्त्वाचा ठरतो.

प्रबोधनकार ठाकरे यांनी उभारलेला सार्वजनिक नवरात्र महोत्सव हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा प्रारंभ होता. जातिभेद मोडून काढत, सर्व समाजाला एकत्र आणणारा हा उत्सव आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

3 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

4 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

22 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

23 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago