An accidental spark in the kitchen created fireworks
दिवाळी असो, गणपती, ख्रिसमस, न्यू इअर किंवा अगदी वाढदिवस… फटाके उडवणं हा या उत्सवांचा अविभाज्य भाग झालेला आहे. फटाक्यांशिवाय सण, आनंद अपूर्णच वाटतो. पण तुम्हाला माहीत आहे का? फटाक्यांचा शोध हा चीनमध्ये एका किचनमध्ये झालेल्या चुकीमुळे लागला, तोही इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात… चला मग जाणून घेऊया काय आहे फटाक्यांचा इतिहास…
फटाक्याचा शोध भारतात लागला नाही. फटाक्याचा शोध लागला आहे चीनमध्ये. ते ही इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात.
तर झालं असं एक चायनीज कुक होता. आता चीनमध्ये चायनीज कुकच असणार म्हणा. तो काही तरी चायनीज स्पेशल जेवण बनवत होता. त्यावेळी साॅल्टपीटर म्हणजेच सायंटीफिक भाषेत पोटॅशीयम नायट्रेट (KNO3) त्याच्याकडून चुकून चुलीत पडलं. त्यावेळी तिथल्या अग्नीतून जोरात आवाज करत वेगळ्याच ज्वाला बाहेर आल्या. त्यांचा रंगसुद्धा वेगळा होता. बघणारे सगळे सटपटलेच.
Diwali 2025:मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणारा मोती साबण दिवाळीचा अविभाज्य भाग कसा ठरला ?
Diwali 2025: पंजाब ते तामिळनाडू आणि कालीपूजा ते कौरिया काठी भारतात ७ प्रकारे साजरी होते दिवाळी
आयला हे काय झालं? कुकमहाशय सुद्धा धक्यातच होते. त्यांना सुद्धा काही सुधरेना. मग साहेबांना लक्षात आलं की आपल्याला काही तरी भारी सापडलं आहे.
अशा तऱ्हेनं जगभरात क्रांती करणाऱ्या गन पावडरचा शोधाचं पहिलं पाऊल पडलं. काही जण म्हणतात की एका हरहुन्नरी चीनी जादुगाराने अमरत्व प्राप्त करण्याच्या नादात गन पावडरचा शोध लावला. याच गन पावडरचा उपयोग भविष्यात फक्त फटाकेच नव्हे तर बंदुकीच्या गोळ्या, बॉम्ब, रॉकेट वगैरे बनवण्यासाठी करण्यात आला.
ऐतिहासिक संदर्भ
चिनी लेखक आणि किमयागार वुई बोयांग याने इसवी सन पूर्व १४२ सालात आपल्या पुस्तकात याचा उल्लेख उडणाऱ्या आणि नाचणाऱ्या ज्वाळा असा केला आहे. वेगवेगळ्या चीनी राजवटीमध्ये त्यावर अधिकाधिक संशोधन करण्यात आलं. इसवि सनाच्या दहाव्या शतकामध्ये कागदात गणपावडर गुंडाळून ते उडवण्याची सुरुवात झाली.
इतिहासकार सतीश चंद्रा हे आपल्या ‘मध्ययुगीन भारत : मुघलांची सल्तनत’ या पुस्तकात अशी नोंद करतात की, इ.स १६०९ मध्ये विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिल शहा याने आपल्या मुलीच्या लग्नात फटक्यांसाठी ८० हजार रुपये खर्च केले होते. भारतात असे आतषबाजीचे किंवा फटक्यांच्या शोचे आयोजन पूर्वीपासून करण्यात येत होते. भारतातील पोर्तुगिज अधिकारी दुओर्टे बार्बोसा यांना लिहून दिले की, “गुजरातमधून प्रवास करताना एका ब्राह्मण फॅमिलीमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात राॅकेट, फटाके आणि आतषबाजी लावण्यात आलेले होते. गुजरातमध्ये त्यावेळी फटक्यांचे प्रमाण जास्त होते.”
पौराणिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये फटाक्यांचा उल्लेख आढळतो. संत एकनाथ महाराजांच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ या ग्रंथात रुक्मिणीचं आणि कृष्णाच्या लग्नाचे वर्णन आहे. त्यामध्ये रॉकेट, फुलझडी, फटाक्यांचा सविस्तर वर्णन केलेले आढळते. १८ व्या शतकापासून दिवाळी मनोरंजनांच्या उद्देशातून फटाक्यांच्या वापरांची खरी सुरुवात झाली. ‘पेशव्यांची बखर’मध्ये उल्लेख आहे की, कोटाह (कोटा, राजस्थान) दिवाळी साजरी करण्यात येत होती. त्यावेळी महादजी सिंधिया पेशवे सवाई माधवराव यांना दिवाळीसंदर्भात सांगतात की, “कोटामध्ये दिवाली ४ दिवसांची साजरी केली जाते. तेव्हा लाखो दिवे लावले जातात… असे सविस्तर वर्णन पेशव्यांना सांगितले. सिंधिया यांचं वर्णन ऐकून पेशव्यांनीही दिवाळी आपल्या इकडे फटाके आणि आतिबाजीचे आदेश दिले.
फटाक्यांचे भारतातील आगमन
चायनीज लोकांच डोकं ते. त्यांनी त्यात अफाट आयडिया लढवून वेगवेगळे फटाके शोधून काढले.
मध्ययुगात चीनवर मोंगोल राज्यांच राज्य होत. ज्यातला चेंगीज खान खूप फेमस होता. हे मोंगोल राजे क्रूर आणि शूर होते. त्यांची घोडदौड चीनपासून ते युरोप पर्यंत होती. त्यांनी फटाके आणि गणपावडर जगभरात नेली. मोंगोल सैन्य भारतात सुद्धा आलं होत मात्र त्यांना अल्लाउद्दिन खिल्जीवर विजय मिळवता आला नाही. पण ते जाताना भारतात फटाके सोडून गेले.
म्हणजेच भारताला फटाके ही चीन आणि मोंगोल खानांची देणगी आहे.
तिथून पुढे भारतात फटाके व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. विजयनगरचा राजा देवरायाच्या राज्यातल्या महानवमी उत्सवात केल्या जाणाऱ्या आतिषबाजीचा उल्लेख दरबारात हजर असणारा तैमुर राज्याचा राजदूत अब्दुल रझ्झाक याने आपल्या एका ग्रंथात केला आहे.
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ परशुराम गोडे यांच्या म्हणण्यानुसार साधारण १३व्या आणि १४व्या शतकात दिवाळीमध्ये फटाके उडवण्यास सुरुवात झाली. फक्त दिवाळीच नव्हे तर प्रत्येक आनंदाच्या प्रसंगात फटाके पाहिजेच अशी वेळ आली. पेशव्यांच्या दिवाळीतल्या आतिषबाजीची किंवा विजापूरच्या इब्राहीम आदिलशाहने आपल्या पोरीच्या लग्नात फटाक्यांच्यावर केलेल्या खर्चाची चर्चा पूर्ण देशभर झाली होती. राजस्थानचे राजपूत राजे दिवाळीमध्ये चार दिवस सलग आतिषबाजी करायचे.
त्याकाळात मुख्यतः गुजरात राज्यामध्ये फटाके बनवले जायचे. इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापारी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या सोबत मॉडर्न दारुगोळा सुद्धा भारतात आणला. मग काय युरोपीय पद्धतीच्या फटाक्यांची चलती सुरु झाली.
एकोणीसाव्या शतकात कोलकातामध्ये भारतातला पहिला आधुनिक फटाक्यांचा कारखाना सुरु झाला. तामिळनाडूमधील शिवकाशी इथे भारतातले सर्वात जास्त फटाके बनवण्याचे कारखाने आहेत.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…