घरातला Cylinder लिक झाला तर सर्वात आधी काय कराल?
अनेकदा घरातला एलपीजी गॅस सिलेंडर लिक झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो.. कित्येकजणांना तर माहितीपण नसत की गॅस लीक झाला तर काय करायचं ते.. पण लक्षात घ्या.. हे danger alert आहे. गॅस लिक होत असेल तर सगळ्यात आधी स्टोव्हचे नॉब, रेग्युलेटर जे काही ON आहे ते लगेच OFF करा.घाबरून… panic होऊन जाऊ नका!
त्यांनतर लगेच जाऊन सगळे दारं -खिडक्या उघडा. गॅस बाहेर जाऊ द्या. आणि हो, हा वेळ अजिबात स्टंट करण्याचा नाही… त्यामुळे माचिस, लाईटर, मेणबत्ती- अगरबत्ती आतमध्ये ठेवून द्या. आणि सर्वात महत्वाचं काहीवेळासाठी कोणताही इलेक्ट्रिक स्विच ON/OFF करू नका!
लहानशी ठिणगीसुद्धा मोठा स्फोट करू शकते.वास जात नसेल तर रेग्युलेटर काढा, सिलेंडरवर सेफ्टी कॅप लावा आणि मुलांना, पाळीव प्राण्यांना दूर ठेवा. सिलेंडर लांब काळ वापरणार नसाल तर तो कोरड्या जागी ठेवाव.आणि समजा ही सगळी काळजी घेऊनही सिलेंडरला आग लागली.. तर? घाबरायचं नाही. तुमच्याकडे काही सेकंद असतात. पटकन एक जाड ब्लँकेट ओलं करा आणि सिलेंडरभोवती गुंडाळा.
याने आग नियंत्रणात येते. आणि लगेचच 1906 या LPG emergency हेल्पलाइनवर कॉल करा.थोडी सावधगिरी, थोडा स्मार्टनेस.. तुमचं घर सुरक्षित ठेवायला उपयोगाचं ठरेल..
“हे तुम्हाला माहित होतं का?कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी follow करा जबरी खबरी!
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…