Whatsapp वरचा एक Video Call करेल तुमचे बँक खाते रिकामे

Lifestyle News

सध्या ऑनलाईन फ्रॉड्सच प्रमाण वाढलं आहे. कॉल, मेसेजद्वारे तुमचे पैसे चोरण्याचे अनेक प्रकार घडत असतातच. या पार्श्वभूमीवर आता नवीन व्हॉट्सऍप स्क्रीन मिररिंग फ्रॉड सुरु झाला आहे. व्हॉट्सऍप आपण सगळेच वापरत असतो, आजकाल बँकांकडून नोटिफिकेशनसुद्धा व्हॉट्सऍप वर मिळतात, म्हणून लोक सहजरित्या या फ्रॉडला बळी पडतात…आणि मग बँक बॅलेन्स संपल्यावर त्यांना स्कॅम लक्षात येतो … घाबरू नका ! हा स्कॅम कसा ओळखायचा हे आपण जाणून घेऊया…

व्हॉट्सऍप स्क्रीन मिररिंग फ्रॉड म्हणजे काय?
यामध्ये सायबर गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सऍप कॉल करतात, आम्ही बँकेतून बोलत आहोत, तुमचा अकाऊंट अपडेट करायचा आहे, अकाऊंट हॅक झाला आहे, असं सांगून घाबरवतात. आम्ही तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो असं सांगून तुमचा विश्वास जिंकतात. आणि मग अकाऊंट्स अपडेट साठी व्हॉट्सऍप वर व्हिडीओकॉल करतात, त्यातही तुम्हाला स्क्रीन शेअर करायला सांगतात. स्क्रीन शेअर केल्यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा, मेसेजेस, अकाऊंट नंबर-पासवर्ड समोरच्या व्यक्तीला कळतात. कीबोर्ड लॉगर, किंवा अन्य सॉफ्टवेअर वापरून सायबर गुन्हेगाऱ्यांना तुम्ही कोणता पासवर्ड टाईप करत आहात, हे कळतं . तुम्हाला येणारे ओटीपी कळतात. त्यामुळे तुमचा अकाऊंट हॅक करणं सहज शक्य होते.

व्हॉट्सऍप स्क्रीन मिररिंग फ्रॉडपासून कसे रक्षण करावे ?
ऑनलाईन फ्रॉड आणि आता ट्रेंड असलेल्या व्हॉट्सऍप स्क्रीन मिररिंग फ्रॉडपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. जे बँक-फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी आहेत असा दावा करतात त्यांची सत्यता तपासा. स्क्रीन शेअरिंग कधीही सुरु करू नका. अकाऊंट संदर्भात काही अपडेट करायचं असेल, तर बँकेच्या वेबसाईट वर किंवा बँकेत जाऊन करा. ओटीपी आणि अकाऊंट नंबर कोणालाही शेअर करू नका. ऍप इन्स्टोलमेंट फ्रॉम अननोअन सोअर्सेस हे सेटिंग बंद करा. कोणी अकाउंट अपडेटसाठी वारंवार कॉल करत असेल तर नंबर ब्लॉक करा. सायबरक्राईमवरती कम्प्लेंट करू शकता. पेमेंट ऍप साठी २ फॅक्टर व्हेरीफिकेशन्स ऑन ठेवा. तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेसाठी बँकेशी थेट संपर्क साधा.

कोणत्याही ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारीसाठी सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० वरती संपर्क साधू शकता अन्यथा cybercrime.gov.in वरती तक्रार नोंदवू शकता . सावध रहे सतर्क रहे !

Leave a Reply