पृथ्वीचा एक नवीन क्वासी-मून म्हणजेच लघुचंद्र सापडला आहे. हा 19 मीटरचा लघुग्रह गेल्या अनेक दशकांपासून पृथ्वीसह सूर्याभोवती फिरत आहे. तो लहान आहे, त्यांमुळे त्याचा शोध लागला नव्हता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आपल्या पृथ्वीला एक चंद्र आहे हे आपल्याला माहिती आहे. मात्र आता दुसऱ्या एका चंद्राचा शोध लागला आहे. अलिकडेच शास्त्रज्ञांनी 2025 पीएन 7 नावाचा एक नवीन ‘क्वासी-मून’ (अर्ध चंद्र) शोधला आहे.
2025 पीएन 7 हा एक छोटा लघुग्रह पृथ्वीसह सूर्याभोवती फिरत आहे, म्हणजे तो पृथ्वीचा चंद्र आहे. विशेष म्हणजे हा चंद्र गेल्या 60 वर्षांपासून पृथ्वी सोबत आहे, मात्र त्याचा शोध अलिकडेच लागला आहे.
क्वासी-मून हा एक प्रकारचा लघुग्रह असतो, जो पृथ्वीसह सूर्याभोवती फिरतो. तो पृथ्वीच्या चंद्रासारखा दिसतो, मात्र प्रत्यक्षात तो सूर्याभोवती फिरतो. असे लघुग्रह पृथ्वीवर तात्पुरते येतात आणि पुन्हा परत जातात.
पृथ्वीला आधीच कार्डिया आणि कामो’ओलेवा सारखे सात क्वासी-मून आहेत.2025 पीएन7 हा सर्वात लहान अर्ध-चंद्र आहे. हा चंद्र 60 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे आणि तो आणखी 60 वर्षे पृथ्वीसोबत राहणार आहे.
2025 पीएन 7 चा व्यास फक्त 19 मीटर (62 फूट) आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून 4.5 दशलक्ष ते 60 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. तो आर्जुना लघुग्रह पट्ट्यातून आला आहे.
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…
कधी काळी स्वतःला भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूने, आज भारताला विश्वविजेता बनवलं आहे. ही…