भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली संघासह ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी विराटचं ६ महिन्यांनी संघात पुनरागमन झालं आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला. विराटने त्याची गुरूग्राममधील प्रॉपर्टी भाऊ विकास कोहलीच्या नावे केली आहे.
Diwali 2025:मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणारा मोती साबण दिवाळीचा अविभाज्य भाग कसा ठरला ?
Diwali 2025: पंजाब ते तामिळनाडू आणि कालीपूजा ते कौरिया काठी भारतात ७ प्रकारे साजरी होते दिवाळी
विराट कोहलीच्या मोठ्या भावाचं नाव विकास कोहली आहे. याशिवाय विराट आणि विकासला एक मोठी बहिणदेखील आहे, जिचं नाव भावना कोहली आहे. विराटचा मोठा भाऊ हा बिझनेसमॅन आहे. विकास कोहलीचा मुलगा आर्यवीर कोहली हा दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता.
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी फक्त एक दिवस आधी १४ ऑक्टोबरला विराट कोहलीने त्याचा मोठा भाऊ विकास याला गुरूग्राममधील प्रॉपर्टीची जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी सुपूर्द केली. यासाठी विराट गुरुग्राममधील तहसील कार्यालयात गेला होता आणि सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो स्वतः वझिराबाद तहसील कार्यालयात पोहोचला होता.
अलीकडेच आपल्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये स्थलांतर झाल्यानंतर, विराट कोहलीने त्याच्या येथील सर्व मालमत्तेशी संबंधित कायदेशीर जबाबदाऱ्या भावाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. या जनरल पॉवर ऑफ अटर्नी (GPA) द्वारे, विकास कोहलीला आता गुरुग्राममधील मालमत्तेशी संबंधित सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाज हाताळण्याचा अधिकार मिळाला आहे. सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्याकरता एअरपोर्टच्या दिशेने निघाला.
जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार, गुरुग्रामच्या डीएलएफ फेज १ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा ८० कोटींचा आलिशान बंगला आहे. सध्या या घरात कोहलीची आई आणि त्याचं कुटुंबीय राहतं. या बंगल्याचं आकर्षक इंटिरियर, उत्कृष्ट लाकडी काम लक्ष वेधणारं आहे. सुमारे १० हजार चौरस फूटांवर पसरलेली ही मालमत्ता स्विमिंग पूल आणि भव्य बार एरियासह सजलेली आहे.
