namaz-being-performed-at-pune-historic-shaniwar-wada
Namaz performed at shaniwarwada: पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ठिकाणी मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घडली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) उशिरा याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरण पोलिसांकडून प्राचीन स्मारके, पुरातत्वशास्त्रीय स्मारके आणि अवशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारकात आहे.
यानंतर शनिवार वाड्यात जाऊन पतित पावन संघटनेने आंदोलन केलं आहे. तसंच सदर जागा गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केल्याचं सांगितलं आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच यापुढे असले प्रकार आम्ही काहीही झालं तरीही खपवून घेणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
मेधा कुलकर्णींनी व्हिडीओ पोस्ट करत काय म्हटलं आहे?
पुण्याचे वैभव – शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय! पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया! अशी पोस्ट लिहून मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळी जाऊन सदर कृतीचा निषेध केला आहे.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…