Autodriver speaks in french
Viral Video :भारतात ऑफिसमध्ये जॉब करणारे किंवा स्वतःचा व्यवसाय करणारे लोक स्वतःला अतिहुशार समजतात. मग चहा वाला असो किंवा रिक्षावाला त्याला काय अक्कल असणार असं त्यांचं मत असतं. पण दुसऱ्यांना कमी लेखू नये हे एका रिक्षावाल्याने सिद्ध केलं आहे. भारतात अनेक लोकांना एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतात. काहींना तर विदेशी भाषादेखील येतात. पण एखाद्या रिक्षाचालकाला परदेशी भाषा बोलता येत असेल, आणि ती ही अगदी अस्खलित… याचा विचार कदाचित कुणीच केला नसेल. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने ही समजूत पूर्णपणे खोटी ठरवली आहे. एका रिक्षाचालकाने चक्क परदेशी भाषेत बोलून एका विदेशी पर्यटकालाही आश्चर्यचकित केले आहे.
Navaratri 2025: राजमाता जिजाऊ साक्षात जगदंबेच्या कन्या! इतिहासात पहिल्यांदाच घडला देवीचा चमत्कार !
हा व्हिडीओ एका अमेरिकन कंटेंट क्रिएटरने बनवला आहे, जो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जय नावाचा हा कंटेंट क्रिएटर रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षाचालकाशी बोलताना दिसतो. तो रिक्षाचालकाला सांगतो की त्याला दोन भाषा येतात- इंग्रजी आणि फ्रेंच.
हे ऐकताच रिक्षाचालकाने लगेच फ्रेंच भाषेत विचारले, ‘तुम्ही फ्रेंच बोलता का?’ एका रिक्षाचालकाच्या तोंडून फ्रेंच ऐकून जयला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो हसू लागला.
हा मजेशीर व्हिडीओ ‘jaystreazy‘ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुमचा ड्रायव्हर भारतात फ्रेंच बोलतो’ असे कॅप्शन त्याला देण्यात आले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. ४८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले असून, अनेक मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…