राज्यात पावसाचा हाहाकार; ऐन नवरात्रौत्सवात भाज्यांनी केली शंभरी पार

Lifestyle News Trending

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झाले आहे. यामुळे ऐन नवरात्रौत्सवात भाज्यांची आवक घटली आहे. स्थानिक बाजारांमध्ये भेंडी, घेवडा, फरसबी, तोंडली, गवार, भोपळी मिरची, वांगी या भाज्यांनी तर शंभरी पार केली आहे.

वाशी येथील एपीएमसी बाजारात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व नाशिक तसेच परराज्यातून भाज्या आयात केल्या जातात. दररोज 650 ते 700 भाज्यांच्या गाड्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होतात. त्यानंतर, या भाज्या मुंबई, ठाणे तसेच इतर उपनगरात विक्रीसाठी पुढे पाठवल्या जातात.

दरदिवशी वाशी बाजारात भाज्या व इतर दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी होते. मात्र गेले दोन दिवस पावसामुळे भाजीपाल्याच्या गाड्या बाजारात येणं कमी झाल आहे. तर काही गाड्या पावसात अडकल्याने उशिरा बाजारात पोहचत आहेत. यामुळे भाजीपाला खराब होण्याची शक्यता वाढली आहे. मंगळवारी केवळ 576 गाड्या बाजारात दाखल झाल्या असल्याची माहिती समिती अध्यक्षांनी दिली.

याचा परिणाम थेट भाज्यांच्या किंमतीवर झाला असल्याचे दिसते. काही भाज्यांनी शंभरी पार केली आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply