ghost trees
Indian haunted trees : वड, पिंपळ आणि चिंच ही झाडं धार्मिकदृष्ट्या पूजनीय असून त्यांच्या भोवती अनेक भूतकथा गुंफल्या गेल्या आहेत.
केवळ कोकणातच नव्हे, पूर्ण भारतात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे बहुतांशी भूतं वड-पिंपळ आणि चिंचेच्या झाडावर असतात. अश्वत्थामा असूदे, मुंजा असूदे किंवा हॉरर मूव्हीजमध्ये वड-पिंपळ ही झाडं आणि वटवाघळं-घुबडं त्यासाठी दाखवली जातात. काहींच्या मते भूत, अतृप्त आत्मे, मूंजा, चेटकीण, हडळ अशा विविध प्रकारची भूतं अस्तित्वात असतात. आणि ही भूतं वड, पिंपळ, चिंच अशा झाडांवर राहतात. पण तुम्हाला प्रश्न पडला आहे का, या पृथ्वीवर लाखो प्रजातींची झाडं, झुडपं आणि वनस्पती आहेत, तरीही या मोजक्याच झाडांवर भूतांचा वास का असतो? जाणून घेऊया…
भूतांच्या कथांमध्येही अनेकदा पिंपळाचा उल्लेख केला जातो. समाजात रूढ असलेल्या भूतकथांच्या आधारावर सांगायचं झालं, तर पिंपळाच्या झाडावर ब्रह्मराक्षस, पितर, अतृप्त आत्मे आणि वेताळ या प्रकारची भूतं असतात. महिला नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ज्या वृक्षाची पूजा करतात त्याच वडावर दुष्ट शक्ती वास करतात, असंही म्हटलं जातं.चिंचेचं झाड सुद्धा भूतकथांमध्ये नेहमीच चर्चेत असतं. चिंचेच्या झाड भुतांनी लवकर बाधित होतं म्हणून ते घराच्या परिसरात लावू नये, असं म्हणतात. आता भूतकथांमध्ये याच झाडांचा उल्लेख प्रामुख्यानं का केला जातो?
वड, पिंपळ, चिंच ही झाडं आकाराने फार मोठी असतात. त्यामुळे ही झाडं रात्री मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड सोडतात. त्यामुळे जर आपण या झाडांखाली झोपलो, तर श्वास गुदमरू शकतो आणि इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात.
दुसरं कारण म्हणजे ही झाडं एकांत स्थळी असतात. कारण या झाडांच्या आसपास दुसरी लहान झाडं जगत नाहीत. काही वनस्पतीशास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, या वृक्षांच्या मुळांमधून काही विषारी घटक उत्सर्जित होतात, जे इतर झाडांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे इथे अन्य झाडं नसतात. पिंपळाच्या पानांची कायम सळसळ होत असते, त्याचा एक गंभीर आवाज असतो. यामुळे रात्रीच्या शांततेत अजून भीती वाटू शकते. चिंचेच्या झाडामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, असे वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि चिंच आणि डोहाळे यांचा एक संबंध जोडला जातो. त्यामुळे त्या बायका मूल झाल्यावर, होताना किंवा आधीच मरतात, त्यांच्यासाठी खासकरून चिंचेच्या झाड भूत म्हणून ठरवलेलं असतं. आणि या सर्व झाडांची गर्द अवस्था, विस्तृतता यामुळे अजून भीती वाटू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचे वड, पिंपळ, चिंच या झाडांबाबत आपण वर्षानुवर्षे भूतकथा ऐकत आलो आहोत. त्यामुळे या झाडांबाबत आपसूकच एक भीती वाटते. रात्रीच्या अंधारात एकांतात उभी असलेली अजस्त्र झाडं पाहून ही भीती द्विगुणित होते. आपली पंचेंद्रिये अधिक जागृत होतात आणि वातावरणात होणारा अगदी छोटासा बदलही टिपतात. त्यामुळे मनात भीती निर्माण होते. आणि एकदा का डोक्यात भीतीनं घर केलं, की म्हणाल तिथे तुम्हाला भूत दिसू लागेल.
थोडक्यात काय? वड, पिंपळ, चिंच ही झाडं आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. आणि त्यामुळेच भूतकथांमध्ये या झाडांचा उल्लेख प्रामुख्यानं केला जातो.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…