Sports

ट्विटरवरचा नवा क्रिकेट ‘वर्ल्ड कप’

क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार तर नेहमीच लागतात, पण सध्या सोशल मीडियावर ‘आईसलँड क्रिकेट’ने असा काही रिव्हर्स स्वीप मारलाय की थेट आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क्लिन बोल्ड झालेत!

या ‘थंड’ देशाला एवढं ‘गरम’ रोस्टिंग करायची वेळ का आली ते बघूया.

सध्या २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपचं वातावरण तापलंय. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात यायला नकार दिला, तर आयसीसीने त्यांना थेट स्पर्धेतून बाहेर काढून ‘स्कॉटलंड’ला एन्ट्री दिली. आता पाकिस्तान म्हणतंय, “बांगलादेश नाही तर आम्ही पण येणार नाही!”

अशा वेळी आईसलँड क्रिकेटने (ज्यांचा ट्विटर हँडल त्यांच्या बॅट्समनपेक्षा जास्त धावतो) एक जबरदस्त ‘ओपन लेटर’ लिहिलंय.

आईसलँडने आयसीसीला सांगितलं, “बाबांनो, पाकिस्तान जर बाहेर पडलं तर आम्हाला बोलावू नका. कारण आमचे खेळाडू हे वेगवेगळ्या व्यवसायातून पुढे आलेत. आमचा कॅप्टन सध्या ओव्हनमध्ये केक बेक करण्यात व्यस्त आहे. आमचा शिप कॅप्टन जहाज चालवतोय आणि बँकर लोक बँका बुडवण्यात (पुन्हा एकदा) बिझी आहेत! आम्ही काही “स्कॉटलंड” सारखे ‘फ्री’ नाही की बॅग भरली आणि निघालो. कोलंबोचं तापमान म्हणजे आमच्यासाठी फिनलंडच्या ‘सौना बाथ’सारखं आहे. आम्हाला ते सहन होणार नाही. त्यामुळे आमचा तोटा हा युगांडाचा फायदा आहे! असं म्हणत त्यांनी युगांडाला पुढं केलंय. युगांडाच्या जर्सीबद्दल बोलताना ते म्हणतात, “त्यांची जर्सी एवढी चमकते की ती दुरूनही दिसेल, पण ज्यांना एपिलेप्सी (फेफरे) येण्याचा त्रास आहे, त्यांनी ती जर्सी न बघितलेलीच बरी!”
आईसलँडने जाता जाता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही टोला लगावला. ट्रम्प यांनी चुकून आईसलँडला ‘ग्रीनलँड’ म्हटलं होतं, त्यावर आईसलँडने “आमच्या ऑरेंज-डाय केलेल्या नेत्याला वाटतंय की आम्ही ग्रीनलँड आहोत” असं म्हणत सॉलिड फिरकी घेतली.

आईसलँड क्रिकेटने जेव्हा युगांडाच्या ‘फ्लोरोसंट’ जर्सीचा आणि त्यांच्या नशिबाचा उल्लेख केला, तेव्हा युगांडा क्रिकेट असोसिएशन शांत बसेल तर ते आफ्रिकन कसले?

युगांडाने आईसलँडच्या त्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटलं, “आमची जर्सी एवढी ब्राइट आहे कारण ती मैदानावरच्या आमच्या कामगिरीचं प्रतिबिंब आहे. तुम्ही बर्फात केक बेक करत बसा, आम्ही इथे इतिहास घडवायला निघालो आहोत!” युगांडाने टोला लगावला की, आईसलँडचे लोक कदाचित थंडीमुळे गोठले असतील, पण आमचे खेळाडू मैदानावर ‘आग’ ओकायला तयार आहेत. पाकिस्तान खेळो वा न खेळो, आमची तयारी ‘फ्लोरोसंट’ जर्सीइतकीच लख्ख आहे. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे, युगांडाने आईसलँडचे आभार मानले. ते म्हणाले, “आईसलँडच्या थंडीत बसून कोणाला तरी आमची आठवण आली, यातच आमचा विजय आहे. आता जगाला कळाले आहे की युगांडाकडे फक्त जर्सी नाही, तर ‘जिगर’ सुद्धा आहे!”

मैदानात भारत-पाकिस्तानची मॅच व्हावी की नाही यावर आयसीसी अजूनही ‘कॅल्क्युलेटर’ घेऊन बसली आहे, पण आईसलँड आणि युगांडाने मात्र सोशल मीडियाचा ‘वर्ल्ड कप’ आधीच जिंकलाय! या दोन्ही देशांनी सिद्ध केलंय की क्रिकेटमध्ये फक्त रन्स महत्त्वाचे नसतात, तर कधीकधी ‘टायमिंगवर’ मारलेला जोक जास्त प्रेक्षक खेचून आणतो. आणि हे सिद्ध करायला त्यांचे ह्या भन्नाट ट्विटनंतरचे एका दिवसात वाढलेले ८००० फॉलोवर्स साक्ष देतील असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

Team Jabari Khabari

Share
Published by
Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

14 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

14 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 day ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago