अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाकडून लष्करी उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्यामुळे दंड आकारण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने स्वत:च्या संरक्षणवादी धोरणांमुळे भारताच्या तुलनेत कमी व्यवसाय केला आहे.
बुधवारी Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी पोस्ट करत सांगितले की, भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी केल्याने हा दंड लावण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून या नव्या कराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच पोस्टमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असले तरी, गेल्या अनेक वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार फारसा वाढलेला नाही. भारत हा आमचा मित्र असला तरी त्यांचे टॅरिफ्स खूप जास्त आहेत. जगातील सर्वात जास्त दरांपैकी एक आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांचासोबत फारसा व्यापार करू शकलो नाही. शिवाय त्यांच्याजवळ सर्वात कठीण आणि त्रासदायक नॉन – मॉनेटरी ट्रेड बॅरिअर्स आहेत असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या ट्रम्प यांनी विविध देशांतून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर वाढीव टॅरिफ कर लादण्याचा धडाका लावला आहे. एप्रिलमध्ये त्यांनी भारतावरही 27 टक्के टॅरिफची घोषणा केली होती, मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापाराची बोलणी सुरू असल्या कारणाने याला स्थगिती देण्यात आली होती.
यानंतर भारताने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याची नोंद घेतली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संतुलित आणि फायदेशीर व्यापार होण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत, आणि भारत त्या उद्दिष्टावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय सरकार या निर्णयाचे परिणाम अभ्यासत असून राष्ट्रीय हित जोपासण्यासाठी आवश्यक असतील ती सर्व पावले उचलणार असल्याचे सांगितले.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…