ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा गण त्याच्या जन्म नक्षत्रावरून ठरतो. हे गण तीन प्रकारचे असतात…
१) देवगण
२) मनुष्यगण
३) राक्षसगण
या गणांवरून व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि लग्न-जुळवणीतील गुणधर्मही समजतात. ज्योतिषशास्त्र अभ्यासक सौ स्वप्नाली विनोद वारिंदे यांच्या मते, हे गण जन्मपत्रिकेतील अतिशय महत्त्वाचे घटक असून शुभकार्यांमध्ये महत्वाचे ठरतात.
देवगण-शांत व संतुलित स्वभाव
देवगणातील व्यक्ती साधारणतः शांत, बुद्धिमान, दयाळू आणि संतुलित स्वभावाच्या असतात. त्यांना अध्यात्मिक गोष्टींचे जास्त आकर्षण असते आणि भूत-प्रेतांसारख्या गोष्टींपासून ते दूर राहतात.
नक्षत्रे: अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती.
मनुष्यगण-व्यवहारकुशल व समजूतदार
मनुष्यगण मध्यम प्रकारचा मानला जातो. या गणातील लोकांमध्ये चांगले-वाईट दोन्ही गुण असू शकतात. ते व्यवहारात बुद्धिमान असतात आणि देवगण तसेच राक्षसगण या दोन्ही प्रकारच्या लोकांशी सहज जुळवून घेऊ शकतात. त्यांच्या कर्मावरून ते वरच्या किंवा खालच्या पातळीवर जाऊ शकतात.
राक्षसगण-तीव्र पण लक्ष्य साधणारा स्वभाव
राक्षसगण म्हणजे राक्षसी वृत्ती नव्हे. या गणातील व्यक्ती थोड्या उग्र किंवा तीव्र स्वभावाच्या असू शकतात, पण त्या तितक्याच ध्येयवेड्या, मेहनती आणि दृढनिश्चयी असतात. लग्न जुळवणीत या गणाचे विशेष महत्त्व असते, कारण दोघांच्या स्वभावातील सुसंगती मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून असते.
एकूणच, प्रत्येक गणाची स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात आणि त्यातून व्यक्तीचा स्वभाव कसा असेल याची एक साधारण कल्पना मिळते. कोणताही गण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून, आपल्या गुणांवर आणि वर्तनावर व्यक्तीची खरी ओळख ठरते. त्यामुळे गण हा माणसाला ओळखण्याचा एक उत्तम मार्ग आहे. परंतु आपले व्यक्तिमत्त्व घडवण्याची खरी ताकद आपल्याच हातात असते, असे ज्योतिषशास्त्र अभ्यासक सौ स्वप्नाली विनोद वारिंदे यांचे मत आहे.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…