Categories: News

चोरी झाली पण चौकीदारानेच चोरांना वाचवले! राहुल गांधींचा ECI वर आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी असा आरोप केला की, “निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, चोरी होताना त्याने पाहिले आणि चोरांना वाचवले.” पहाटे ४ वाजता उठून फक्त ३६ सेकंदात दोन मतदारांची नावे हटवली जात होती आणि नंतर पुन्हा झोप घेतली जात होती, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत फेरफार केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मतपत्रिकेतील नावे हटवणे, मते डिलीट करणे अशा प्रकारच्या कथित गैरप्रकारांचे पुरावे सादर केले होते. शुक्रवारी त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. “X” पोस्ट करत त्यांनी लिहिले, “पहाटे ४ वाजता उठायचे, ३६ सेकंदात दोन मतदारांची नावे डिलीट करायची आणि पुन्हा झोपायचे… अशा प्रकारे वोटचोरी झाली. निवडणूक आयोग काँग्रेसच्या मतदारांना लक्ष्य करत आहे आणि त्यांच्या नावांची यादीतून काटछाट करत आहे.”

राहुल गांधींच्या या आरोपांना निवडणूक आयोगाने तीव्र शब्दांत फेटाळले आहे. आयोगाने स्पष्ट केले की, कोणताही नागरिक ऑनलाइन पद्धतीने इतरांचे मत रद्द करू शकत नाही. मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते, असेही आयोगाने सांगितले. आयोगाने राहुल गांधींचे आरोप “खोटे आणि निराधार” असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

3 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

4 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

22 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

22 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago