जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर 

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण करणारे जय जवान पथक सगळ्यांच्याच माहितीत आहे. हंडी फोडताना पथकाची शिस्त आणि प्रत्येक थरात दिसणारे साम्य यामुळे या पथकाची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे. मात्र या पथकाला यावर्षी प्रो-गोविंदा लीगमध्ये संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे पथकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. […]

Continue Reading

उद्धवजी, तुम्हाला सत्तेत आणतो’ – फडणवीसांची सभागृहात धक्कादायक ऑफर!

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत […]

Continue Reading

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका […]

Continue Reading

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग – घणसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण

भारताच्या आधुनिक रेल्वे युगाची सुरुवात करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. घणसोली आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांब बोगद्याचा पहिला भाग आता पूर्ण झाला आहे. ही केवळ अभियांत्रिकीची कामगिरी नसून, भारताच्या गतिशील विकासदृष्टीची ओळख आहे. हा बोगदा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात क्लिष्ट आणि आकर्षक भाग मानला जात होता. चला […]

Continue Reading

मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या […]

Continue Reading

संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज […]

Continue Reading

स्थलांतरित पक्ष्यांसाठी भारतातील ८ पक्षीमित्र गावांची प्रेरणादायी कहाणीजिथे माणसं निसर्गाची जबाबदारी घेऊन पक्ष्यांसाठी घर बनवतात!

दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे भारतात येतात. थंडीपासून बचाव, अन्न व पाण्याचा शोध, तसेच प्रजननाच्या योग्य जागा शोधण्यासाठी हे पक्षी विविध देशांतून भारतात स्थलांतर करतात. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो – पर्यावरणीय बदल, शिकारी, अन्नाच्या टंचाईपासून ते मानवी अतिक्रमणापर्यंत अनेक संकटे.अशा वेळी, भारतात अशी काही गावे आहेत, […]

Continue Reading

विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू खासगी सचिव म्हणून कार्य केलेल्या या अनुभवी अधिकाऱ्याला, भारत-पाकिस्तान संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते एक अत्यंत अनुभवी, शांत, परिपक्व आणि राजनयिक मुत्सद्देगिरीने समृद्ध अधिकारी आहेत. शस्त्रसंधी […]

Continue Reading

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा फोन

पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्याचे प्रतिउत्तर म्हणून भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकने संपूर्ण देशात खळबळ माजवली. या कारवाईचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं देण्यात आलं असून, यामध्ये अनेक दहशतवादी तळ लक्ष्य केल्याची माहिती संरक्षण खात्याने दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं असताना, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पुढे आली […]

Continue Reading

‘व्वा काय प्लॅन’ – विनोदाच्या गाभ्यातून गंभीरतेचा स्पर्श करणारे संजय खापरे यांचे नवे नाटक!

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी रंगभूमीवर विविध विषयांची नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या मालिकेत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे – ‘व्वा काय प्लॅन’! अभिनेता-दिग्दर्शक संजय खापरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नवे नाटक २४ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रथमच सादर झाले आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यानंतर नाट्यरसिकांच्या टाळ्यांच्या […]

Continue Reading