काँग्रेस खासदार राहुल गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबाबत केलेल्या अवमानकारक विधानविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याप्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी बदनामी प्रकरणावर स्थगिती दिली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने 2022 साली भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय लष्कराबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी एका भाषणादरम्यान “चीनी सैनिक अरूणाचल प्रदेशात भारतीय जवानांना झोडपून काढत होते मात्र प्रसारमाध्यमे यासंदर्भात काहीच दाखवणार नाहित” या आशयाचे विधान चीनच्या कारवायांवरून सरकारवर टीका करण्यासाठी करण्यात आले होते. त्याचबरोबर चीननं भारताचा 2 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केला आहे, या विधानावरून देखील त्यांना प्रश्न करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने, ” हे विधान तुम्ही सोशल मीडियावर का केल? संसदेत का नाही? तुम्हाला कसं कळलं की चीनने 2000 चौ.कि.मी भूभाग गिळंकृत केला आहे? याबाबत तुमच्या जवळ काही विश्वासार्ह पुरावे आहेत का? एक खरा भारतीय अशा प्रकारचे वक्तव्य करणार नाही. जेव्हा सीमारेषेवर संघर्ष सुरू असतो, तेव्हा असे बोलणे योग्य आहे का? 19(1)(a) कलमानुसार बोलण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्याच्या गैरवापर करता येणार नाही, असे न्यायालयाने राहुल गांधींना बजावले.
2020 साली भारत-चीन सीमारेषेवर सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत अनेक जवान जखमी झाले होते. या घटनेनंतर भारत आणि चीनमधल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यापूर्वी 2017 मध्ये डोकलाम भागातही अशाच प्रकारचा लष्करी संघर्ष उभा राहिला होता. दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये चीनच्या भारतीय सीमेवर सुरू असलेल्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी हे वादग्रस्त विधान केलं होतं.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…