अथांग अंतराळातून पृथ्वीपर्यंत..

नऊ महिने! हो, तब्बल नऊ महिने गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे, जिथे दिवस-रात्र वेगळे नाहीत, जिथे शरीराच्या मर्यादा सतत कसोटीला लागतात आणि जिथे माणसाच्या इच्छाशक्तीची खरी परीक्षा होते! अशा अंतराळातील या रोमांचक प्रवासाचा भाग होते नासाचे दोन धाडसी अंतराळवीर – सुनीता विल्यम्स आणि बुट्‌च विलमोर! त्यांनी आपल्या अद्वितीय जिद्दीने आणि शौर्याने मानवाच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला.

ही मोहीम केवळ काही दिवसांची असणार होती, पण Boeing Starliner च्या तांत्रिक अडचणींमुळे हा प्रवास एका अविस्मरणीय संघर्षात बदलला. विज्ञानाच्या प्रगतीसाठी, मानवाच्या अंतराळ स्वप्नांसाठी, त्यांनी नऊ महिने अवकाश स्थानकावर घालवले. त्यांनी अवकाश स्थानकावर शास्त्रीय प्रयोग, तंत्रज्ञान चाचण्या आणि microgravity मुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन केलं. त्याहीपेक्षा थक्क करणारी गोष्ट म्हणजे – सुनीता विल्यम्स यांनी दुसरी महिला अंतराळवीर म्हणून सर्वाधिक वेळ spacewalking करण्याचा विक्रम प्रस्थापित केला!

या धाडसी मोहिमेच्या यशात SpaceX चा मोलाचा वाटा आहे. त्यांनी तयार केलेलं Dragon Freedom अवकाशयान. हे तेच यान जे त्यांना अंतराळ स्थानकावर नेऊन पोहोचवणारं आणि पुन्हा सुरक्षित पृथ्वीवर घेऊन येणारं ! पण अंतराळातून पृथ्वीवर परत येणं एवढं सोपं नव्हतं! या प्रवासात अंतराळयानाला अतिशय उच्च तापमान आणि वेगावरून जावं लागतं—उल्केसारखं जळत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणं हे एक मोठं आव्हान असतं. मात्र, SpaceX च्या प्रगत तंत्रज्ञानामुळे हे यशस्वीपणे पार पडलं. Dragon Freedom ने उत्तम तापरोधक प्रणाली (heat shield) वापरून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश (reentry) करत, फ्लोरिडाच्या समुद्रात हे यान सुरक्षितपणे खाली उतरले.

या अंतराळ मोहिमा दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. यामुळे शरीरावर मोठे परिणा महोतात. अंतराळात राहिल्यामुळे स्नायू कमकुवत होतात, हाडांची घनता कमी होते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण बदलते. अंतराळवीरांना अनेकदा संवेदनहीनता, स्नायू कमजोर होणे आणि हृदयावर परिणाम होण्याचा अनुभव येतो, कारण दीर्घकाळ microgravity मध्ये राहिल्यामुळे शरीराचा नैसर्गिक समतोल बिघडतो. आता सुनीता विल्यम्स आणि बुट्‌च विलमोर यांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी विलगीकरणात (Isolation) राहावे लागेल. त्यांचे स्नायू आणि संतुलन करण्यासाठी त्यांना पुनर्वसन (rehabilitation) प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासणी आवश्यक असेल.

पण ही केवळ एका मोहिमेची सांगता नाही, तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे! मानवजातीच्या अंतराळ स्वप्नांना आता आणखी बळ मिळालं आहे. दीर्घकालीन अंतराळ मोहिमा आणि नव्या प्रवासाच्या वाटा आता खुल्या झाल्या आहेत!

अंतराळ अनंत आहे, पण मानवाच्या स्वप्नांची उड्डाणे त्याहूनही पुढे जाणारी आहेत!

Admin

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

16 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

17 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago