मुंबईच्या या गजबजाटीच्या वातावरणात सकाळी एक आवाज कानांना सुमधूर वाटतो. दिवसाची सुरूवात चिमण्यांच्या चिवचिवाटाने झाली तर याहून सुख ते काय… हा लहानगा पक्षी आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. परंतू ती नैसर्गिकदृष्ट्या एक अत्यंत महत्वाचा भाग मानली जाते. परिसरातील जैवविविधता वाढवण्यामध्ये चिमण्यांचा अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे.
चिमण्या निसर्गाच्या दृष्टीने महत्वाच्या कशा? याचं उत्तर म्हणजे चिमण्यांना बीजप्रसारक म्हणून ओळखले जाते. चिमण्या फळातील बी खातात आणि त्यातील काही बिया त्यांच्या पचनसंस्थेतून अखंड पडतात किंवा मलविसर्जनानंतर त्यातील काही भाग मातीमध्ये मिसळला जातो. या बिया मातीत रूजल्यास तेथे नैसर्गिकरित्या झाडांची वाढ होते. ज्या भागांमध्ये मानवाला झाडे लावणं शक्य नाही, अशा दुर्गम भागांमध्येगी चिमण्या बीजप्रसारण करून हरित पट्टे निर्माण करू शकतात. याशिवाय चिमण्या किटक खातात, विशेषत: शेतीसाठी हाणीकारक असलेले किटक. जेथे कीटकनाशकांचा अतिवापर होत आहे, तेथे चिमण्यांसारखे पक्षी हे नैसर्गिक रक्षक ठरू शकतात.
दुर्दैवाने, शहरीकरणामुळे आणि मोबाईल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. झपाट्याने होणाऱ्या पुनर्विकासामुळे त्यांची घरटी उद्धवस्त केली जात असल्याने प्रजनन देखील कमी होत चालले आहे. त्याचबरोबर त्यांचे खाद्यस्त्रोतही कमी होत चालले आहेत. चिमण्याच जर नाहिशा झाल्या तर बीजप्रसारणाची नैसर्गिक साखळी खंडित होईल, ज्याचा परिणाम प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या पर्यावरणावर होईल
आपण काय करू शकतो? घराच्या खिडकीत चिमण्यांसाठी पाणी आणि दाणे खायला ठेवा. शक्य असल्यास पक्ष्यांकरीता घरट्यांसाठी जागा उपलब्ध करणे. चिमण्यांच संरक्षण ही आपली नैतिक जबबादारी आहे. आपल्या एका छोट्या कृतीतून आपण आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो.
चिमण्यांमुळे शहरांमधील काँक्रिटच्या जंगलात देखील मोकळा श्वास घेता येऊ शकतो. चिमण्या म्हणजे निसर्गाचं संगीत, जीवनाचा श्वास, आणि हिरव्या भविष्याची आशा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावायला हवा.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…