लडाखमध्ये राज्यत्व आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी उसळलेल्या हिंसक आंदोलनानंतर शुक्रवारी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली. लडाखचे पोलीस महासंचालक एस. डी. सिंह जमवाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने वांगचुक यांना अटक केली. लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराला सरकारने वांगचुक यांना जबाबदार ठरवले आहे.
गुरुवारी केंद्र सरकारने वांगचुक यांच्या SECMOL या NGO चा परदेशी निधी (FCRA) परवाना रद्द केला. परदेशी योगदान नियमन कायदा 2010 च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत हे पाऊल उचलण्यात आले. मंत्रालयाने बुधवारी झालेल्या हिंसाचारासाठी वांगचुक यांच्या भाषणांन दरम्यान आंदोलकांना चिथावले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. वांगचुक यांना अटक केल्यानंतर लेहमधील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
बुधवारी झालेल्या आंदोलनाला हिंसाचाराचे रूप आले होते. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर 80 हून अधिक जखमी झाले. यानंतर लेहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. आंदोलकांनी गाड्यांना आग लावली, पोलिसांनी जमावला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…