Navaratri 2025 on Goa airport

Viral Video: फ्लाईट लेट झाल्यामुळे प्रवाशांचा एअरपोर्टवरच दांडिया; पहा व्हिडीओ..

News

भारतीय उत्सवप्रेमी आहेत यात शंकाच नाही. त्यामुळेच परदेशी गेले तरी सोबत आपली संस्कृती घेऊन जातात आणि साजरीही करतात. नवरात्रीत ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये गरबा खेळतात हे तुम्ही पाहिले, वाचले असेल, पण चक्क गोवा एअर पोर्टवर गरबा खेळून प्रवाशांनी विमान कर्मचाऱ्यांनाही सामावून घेतलं. 

नवरात्रीच्या या काळात सुरतला गरब्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांची गोव्याहून सुटणारी फ्लाईटला पाच तास लेट झाली. तांत्रिक कारणामुळे फ्लाईट उशिरा येणार असल्याने, प्रवाशांना एअरपोर्टवर वाट पाहणे अपरिहार्य होते. मात्र,काही काळाने प्रवाशांनी मरगळ झटकून एअर पोर्टवर म्युझिक सिस्टीम मागवली आणि चक्क गाणी लावून उत्साहाने फेर धरला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सुरतला जाण्यास उत्सुक असलेल्या एका प्रवाशाने गरबा खेळण्याची इच्छा फ्लाईट अटेंडंटकडे व्यक्त केली आणि त्यानंतर एका एअरलाईन कर्मचाऱ्याने पुढाकार घेत एअरपोर्टवर लगेच स्पीकर्सची व्यवस्था केली. स्पीकरवर पारंपरिक गरब्याचे संगीत सुरू होताच, गोव्याचा एअरपोर्ट काही क्षणातच गरबा मैदान झाले.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये प्रवासी उत्साहाने टाळ्यावर टाळ्या देत, गोल रिंगणात गरबा खेळताना दिसत आहेत. केवळ प्रवासीच नव्हे, तर एअरलाईनचे कर्मचारीही त्यांचे काम सांभाळून या आनंदात सहभागी झाले आणि तेही थिरकले. गुजरातमध्ये जाऊन गरबा खेळण्याची हौस प्रवाशांनी एअरपोर्टवर भागवली आणि स्वतः बरोबर इतरांनाही सामावून घेतले.

Leave a Reply