Categories: News

Sleep Cycle : रात्री उशिरा जागता येतं पण सकाळी लवकर उठता का येत नाही? पहा ‘ही’ आहेत कारणं

Sleeping Late at Night: तुम्हाला कधी वाटलंय का की, उशिरापर्यंत जागं राहणं सोपं वाटतं; पण लवकर उठणं खूप कठीण असतं? पण तुम्ही असं वाटणारे तुम्ही एकटे नाही आहात आणि तुम्ही आळशीही नाही. यासंदर्भात डॉक्टरांनीही माहिती दिली आहे. याचं कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आणि नैसर्गिक जैविक घड्याळात दडलं आहे.

“न्यूरोलॉजिस्टच्या दृष्टीनं पाहिलं तर, उशिरा झोप न लागणं आणि लवकर उठणं कठीण वाटण्याचं कारण आपल्या मेंदूतील जैविक घड्याळ- ज्याला सर्केडियन ऱ्हिदम म्हणतात. मेंदूच्या हायपोथॅलॅमस भागात असलेलं सूप्राकायाझमॅटिक न्युक्लियस (SCN) हे सर्केडियन ऱ्हिदमचं ठिकाण आहे. मेंदूतील जैविक घड्याळामुळे आपली झोप आणि जागं राहण्याच्या वेळा नियंत्रित होतात. हे घड्याळ वा ऱ्हिदम प्रकाश, हार्मोन्स व शरीराचं तापमान अशा संकेतांवर आधारित असतो.

तुम्ही सकाळी उठणारी व्यक्ती का नाहीत?
खूप लोकांमध्ये, विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांमध्ये, हे अंतर्गत घड्याळ नैसर्गिकरीत्या उशिरानं चालतं. “याचा अर्थ असा की, त्यांना उशिरापर्यंत जागं राहण्याची नैसर्गिक इच्छा जास्त असते आणि झोपेसाठी शरीराला संकेत देणारा मेलाटोनिन हा हार्मोनही रात्री उशिरा स्रवतो.” मेलाटोनिन उशिरा स्रवल्यामुळे लोकांना उशिरा झोपायला जाणं सोपं वाटतं; पण सकाळी लवकर उठणं खूप कठीण जातं.

“उशिरा झोपायला जाणं हे जैविकदृष्ट्या सोपं असतं; पण मेंदूला सकाळी लवकर जागं आणि सतर्क ठेवणं खूप कठीण असतं,” “अ‍ॅडेनोसिन नावाचा न्यूरोट्रान्समीटर, जो दिवसभर मेंदूमध्ये साठतो आणि झोपेचा दबाव निर्माण करतो, तो आपण उशिरापर्यंत जागं राहिलो, तर कमी होतो.” पण, जेव्हा आपण मेंदू तयार नसताना लवकर उठायचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदूमधील हा नाजूक समतोल बिघडतो.

“अ‍ॅडेनोसिन साफ होण्याचा आणि सर्केडियन जागरtकतेचा समतोल बिघडतो. ldयामुळे सकाळी लवकर अलार्म वाजल्यावर लोकांना सुस्ती आणि उठायला त्रास होतो,” असंही डॉक्टर म्हणतात.

आधुनिक तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम
आधुनिक जीवन या झोपेच्या घड्याळाला अजून वाईट करते. “स्क्रीनवरचा प्रकाश मेलाटोनिन स्राव आणखी उशीर करतो, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागं राहणं सोपं होतं.” तर, लवकर उठण्यासाठी शरीराला कॉर्टिसोल आणि शरीराचं तापमान लवकर वाढवावं लागतं; पण जर अंतर्गत घड्याळ अजून झोपेच्या स्थितीत असेल, तर ही प्रक्रिया हळू होते. “लवकर उठण्यासाठी कॉर्टिसोल आणि शरीराचं तापमान अचानक वाढावं लागतं; पण जर सर्केडियन ऱ्हिदम उशिरा असेल, तर शरीर अजून त्यासाठी तयार झालेलं नसतं,”

Team Jabari Khabari

Recent Posts

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

3 minutes ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

3 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

4 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

22 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

23 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago