गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या भावांनी अक्षरश: झेप घेतली. त्यांच्या किंमतींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली. जागतिक बाजारात झालेल्या अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या ही वाढ झाली आहे. मात्र यामुळे आर्थिक विश्वातल्या दोन मोठ्या दिग्गजांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
‘Rich Dad Poor Dad’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी ‘Berkshire Hathway’ चे सीईओ वॉरेन बफे यांच्या वक्तव्याला उद्देशून टीका केली आहे.
वॉरेन बफे यांनी अनेकदा सोन्याला ‘निष्प्रयोजन’ संपत्ती म्हणाले होते. बफे यांच्या मते कंपन्या किंवा शेअर्स यांसारखी परतावा देण्याची क्षमता सोन्यामध्ये नाही. 1998 साली “Gold gets dug out of the ground in Africa, or some place. Then we melt it down, dig another hole, bury it again and pay people to stand around guarding it. It has no utility. Anyone watching from Mars would be scratching their head.”
(“सोनं पृथ्वीच्या जमिनीतून खणून काढतात, मग वितळवतात, मग दुसरी जागा खणतात, पुन्हा त्यात गाडून लोकांना ते राखण्यासाठी पैसे देतात. याचा प्रत्यक्ष वापर नाही! कोणीतरी मंगळावरून पाहिलं तर डोकं खाजवेल.” त्यापलीकडे त्याचा उपयोग नाही ) असे वक्तव्य केले होते.
मात्र आता त्यांचा सोने-चांदी याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तसेच सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन असल्याचे सांगितले. आजच्या अस्थिर आणि धोकादायक आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांनीही माघार घेत सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
बफे यांनी दिलेल्या मान्यतेमुळे रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या “X” अकाऊंटवरून थेट प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी वर्षानुवर्षे सोनं घेणाऱ्यांना चिडवले, तेच आज सोनं-चांदी घेण्याचा सल्ला देत आहेत. म्हणजेच शेअर मार्केट आणि बॉण्ड बाजार मोठ्या घसरणीकडे जाताना दिसत आहे की काय? अशी शक्यता कियोसाकी यांनी व्यक्त केली आहे. कियोसाकींच्या म्हणण्यानुसार वॉरेन बफेसारखे दिग्गज किमती धातूंमध्ये गुतवणूक करणार असतील, तर हे भविष्यातील आर्थिक वादळाते लक्षण आहे.
यामुळे आता बफे यांच्या म्हणण्यानुसार, सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरिअम यासारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कराण्याची गरज आहे.
