News

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात असलेली 36 वर्षांची महादेवी (माधुरी) या हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथील हत्ती संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी 28 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महादेवीला वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हत्तीणीची अवस्था फार वाईट असल्याचे कोर्टाने सांगितलं त्याचबरोबर सध्या तिची काळजी घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना मठामध्ये उपलब्ध नसल्याने तिला उपचारांकरीता योग्य ठिकाणी पाठवणे गरजेचे असल्याचे खंडपीठाने सांगितले. न्यायलयाने दिलेल्या तटस्थ निर्णयानंतर मठाच्या संचालकांनी गावकऱ्यांना उद्देशून न्यायलयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान न करता दिलेला आदेश पाळायला हवा असे सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रुंचा बांध फुटला. यानंतर मठामध्ये काही मिनिटे फक्त हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता.

महादेवी 1992 पासून म्हणजेच तब्बल 34 वर्षांपासून या मठात आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात नांदणी गावातील ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. लढायचं, भिडायचं ते आपल्या महादेवीसाठी! अशा घोषण देत हत्ती बचाव कृती समितीने मोर्चा काढला होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गुजरातहून आलेल्या गाड्या महादेवीला नेण्याकरीता गावात थांबल्या होत्या. मात्र, ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत, गावात मोर्चा काढला.

नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ येथे गेल्या 400 वर्षांपासून हत्ती ठेवण्याची प्रथा आहे. 1992 मध्ये महादेवी 2 वर्षांची असताना तिला मठात आणले गेले होते. त्यानंतर ती गेली अनेक वर्षे इथेच होती. या हत्तीणीचा वापर गावातील पुजेसाठी, समारंभामध्ये, मिरवणुकांमध्ये आणि उत्सवांमध्ये केला जात होता. येथील स्थानिक भाविकांसाठी महादेवी हा श्रद्धेचा विषय होता. त्यामुळे महादेवीला गावाबाहेर नेण हे येथील स्थानिकांना मान्य नव्हतं. महादेवी ही आमची देव आहे, असे म्हणत त्यांनी आंदोलन केलं. न्यायलयाने दिलेला हा निर्णय धार्मिक भावना दुखावणारा आणि परंपरेच्या विरोधात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

PETA चा अहवाल
PETA (People for the Ethical Treatment of Animals) India ने 2017 मध्ये तिने मठाच्या मुख्य पुजाऱ्याला वारंवार भितींवर आपटून मारले असल्याचा दावा केला. 2023- 2024 दरम्यान वनविभागाला लेखी तक्रार केली. या तक्रारीमध्ये महादेवीला 1992 पासून मंदिरात एकटे साखळदंड बांधून ठेवण्यात आले आहे.

2024 मध्ये पेटाने महाराष्ट्र वन विभाग आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीकडे तिच्या बिघडलेल्या मानसिक आणि शाररिक त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली. महादेवीच्या आयुष्यातील बहुतांश काळ काँक्रीटवर घालवल्यामुळे तिच्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम झालेले दिसून येत आहेत. यानंतर हायपॉवर कमिटीकडून हत्तीणीची तपासणी करण्यात आली. यामध्ये महादेवीला मोठ्या प्रमाणात क्रोनिकल इलनेस असल्याचे आढळून आले. घाणीमध्ये आणि ओल्या जमिनीवर सातत्याने उभ राहिल्याने तिच्या तळव्यांना फंगल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल असल्याच म्हटल होतं. त्याचबरोबर तिला संधिवात असल्याचं देखील समोर आलं. सारखं बसून बसून जखमा झाल्याचं आढळून आलं. धार्मिक कार्यक्रमांमध्ये जेव्हा तिला वापरलं जायचं तेव्हा तिची परिस्थिती अजून बिकट होत असल्याचे अहवालात सांगण्यात आले.

वनतारा येथे महादेवीसाठी महत्वाची असलेली हायड्रोथेरपी आहे. तिला फिरण्याकरीता मोकळी जागा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिची काळजी घेण्यासाठी उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि इंस्ट्रुमेंट सगळं काही आहे. त्यामुळे महादेवीची वनतारामध्ये योग्यप्रकारे काळजी घेण्यात येईल असे म्हटले जात आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

2 days ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

3 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

3 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

5 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

5 days ago

31st TMC Varsha Marathon 2025 : रोज तर धावताचं! एकदा मॅरेथॉनमध्ये धावा! ठाणे वर्षा मॅरेथॉनची नोंदणी सुरू

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे महानगरपालिकेची प्रतिष्ठीत वर्षा मॅरेथॉन पुन्हा नव्या उर्जेसह दि. 10 ऑगस्ट 2025…

5 days ago